पुणे Cricket World Cup 2023 : क्रिकेटमध्ये विक्रमांवर विक्रम रचत असलेल्या विराट कोहलीनं गुरुवारी पुण्यातील मैदानात पुन्हा बांगलादेशविरुद्ध वर्ल्डकपमधील चौथ्या सामन्यात दमदार नाबाद शतकी खेळी टीम इंडियाला चौथा मिळवून दिला. या विजयाचे शिल्पकार विराट कोहली आणि केएल राहूल होते.
सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यासाठी एका शतक : या शतकामुळं विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे. कोहलीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील 48 व्या शतकाची नोंद केली. यामुळं सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यासाठी आता त्याला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. त्यामुळं शतकांचे अर्धशतक होण्यासाठी त्याला अवघ्या दोन शतकांची गरज आहे. हा विक्रमही या विश्वचषकात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-
Virat Kohli slams his 48th ODI ton in an emphatic India win in Pune 🔥@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvBAN pic.twitter.com/3WoTTGy0f8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat Kohli slams his 48th ODI ton in an emphatic India win in Pune 🔥@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvBAN pic.twitter.com/3WoTTGy0f8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 19, 2023Virat Kohli slams his 48th ODI ton in an emphatic India win in Pune 🔥@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvBAN pic.twitter.com/3WoTTGy0f8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 19, 2023
धावांचा पाठलाग करताना विश्वचषकात पहिलंच शतक : कोहलीनं या शतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत र्वात वेगानं 26,000 धावांचा टप्पा ओलांडला. कोहलीच्या पुढे धावांच्या बाबतीत फक्त आता सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पॉंटिंग हे तीनच खेळाडू आहेत. कोहलीचा फिटनेस आणि फॉर्म पाहता तो निश्चितच दुसऱ्या क्रमांकापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. विश्वचषकात कोहलीनं आठ वर्षांनी शतक झळकावलं. धावांचा पाठलाग करताना विश्वचषकात त्याचं हे पहिलंच शतक ठरलं. यापूर्वी 2011 मधील विश्वचषक स्पर्धेत कोहलीनं बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती.
- भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतकं
7 - रोहित शर्मा
6 - सचिन तेंडूलकर
4 - सौरव गांगूली
3 - शिखर धवन
3 - विराट कोहली
- भारतीय मैदानांवर एकदीवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
587 - विराट कोहली, विशाखापट्टणम
551 - विराट कोहली, पुणे
534 - सचिन तेंडूलकर, बेंगलूरू
529 - सचिन तेंडूलकर, ग्वालियर
496 - सचिन तेंडूलकर, कोलकाता
- विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका मैदानावर 500 पेक्षा जास्त धावा
800 - शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम, मिरपूर, ढाका
644 - आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
587 - विशाखापट्टणम
571 - पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
551 - महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियम, पुणे
हेही वाचा :
- World Cup २०२३ : विश्वचषक सामन्यासाठी वानखेडे मैदान सज्ज, प्रेक्षकांची गर्दी घडवणार इतिहास?
- World Cup 2023 : दुखापतींमुळं पाकिस्तान संघाची चिंता वाढली, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सान्यात पाकिस्तान संघाचा काय आहे जुगाड?
- Cricket World Cup 2023 IND Vs BAN : भारतानं उडवला बांगलादेशचा धुव्वा, कोहलीनं केला नवा विक्रम