ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : आठच सामन्यात आठ नवे विक्रम; आतापर्यंत कोणकोणते नवीन रेकॉर्ड झालेत, वाचा एका क्लिकवर

Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत आठ सामन्यात अनेक विश्वविक्रम झालेत. तसंच अनेक विक्रम मोडीतही निघालेत. आणखी अनेक विक्रम यावर्षी होऊ शकतात.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 10:03 AM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : मंगळवारी रात्री उशिरा राजीव गांधी स्टेडियमवर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननं श्रीलंकेविरुद्ध विजयी धावा ठोकल्या आहेत. यासोबत पाकिस्ताननंही रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केलाय. ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या विश्वचषकाकत आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांत फलंदाजीचे काही मोठे विक्रम यापूर्वीच मोडीत निघाले आहेत. त्यासोबतच काही इतर रेकॉर्डही झाले आहेत, कोणकोणते नवीन रेकॉर्ड या विश्वचषकात बनले आहेत, वाचा..

  1. दक्षिण आफ्रिकेनं नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर श्रीलंकेविरूद्ध 482 धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या ठरली आहे.
  2. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमनं विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतकाची नोंद केलीय. त्यानं श्रीलंकेविरूद्ध अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावलंय. त्यापुर्वी हा रेकॉर्ड आर्यलॅंडच्या केवीन ओब्रायनच्या नावावर होता. त्यानं 2011 च्या विश्वचषकात इंग्लंडविरोधात ही दमदार कामगिरी केली होती. त्यानं 50 चेंडूत शतक झळकावलं होतं.
  3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामना, दक्षिण आफ्रिकानं जिंकला होता. त्यात आणखी एक विक्रम रचला गेला. विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिक धावा या सामन्यात निघाल्या. या सामन्यात दोन्हा संघांनी मिळून एकूण 754 धावा झाल्या.
  4. कालच्या सामन्यात पाकिस्ताननं विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग केला. मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांच्या शतकी खेळीमुळं पाकिस्ताननं रोमहर्षक लढतीत 345 धावांचं आव्हान पार केलं. याआधी हा विक्रम आर्यलॅंडच्या नावावर होता. 2011 च्या विश्वचषकात बेंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्ध आर्यलॅंडनं 328 धावांचा पाठलाग केला होता.
  5. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात दोन्ही संघांकडून चार शतके झाली. एका सामन्यात चार शतक होण्याची विश्वचषकाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. श्रीलंकेच्या कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा यांनी शतकं ठोकली, तर पाकिस्तानसाठी अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकं ठोकली आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या सामन्यात प्रथमच एका संघाकडून तीन शतकं एका सामन्यात झळकावण्यात आली. दक्षिण आफ्रकेच्या क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि एडन मार्करम यांनी शतकं ठोकली.
  6. राजीव गांधी स्टेडियमवर काल श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद रिझवानच्या नाबाद 131 धावा ही एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानी यष्टीरक्षकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानं 2005 मध्ये ब्रिस्बेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 124 धावा करणाऱ्या कामरान अकमलचा रेकॉर्ड मोडलाय.
  7. पाकिस्ताननं आता विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळले गेलेले सर्व आठही सामने जिंकले आहेत, हा देखील एक विक्रमच आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात जार्वोची एन्ट्री, विराट कोहलीनं कामाचं कौतुक केल्याचा जार्वोचा दावा, शेअर केला व्हिडिओ
  2. Shubman Gill News : शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज, भारत-पाकिस्तान सामन्यात खेळणार का?
  3. Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.