हैदराबाद Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकाच्या बाद फेरीची शर्यत अजूनही खुली आहे. अद्याप कोणत्याही संघाला उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करता आलेलं नाही. सलग ६ विजयानंतर, भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असून केवळ बांग्लादेश स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
अजून १४ ग्रुप सामने खेळणं बाकी : यजमान भारतासोबत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सध्या टॉप ४ मध्ये आहेत. मात्र अजूनही १४ ग्रुप सामने खेळायचे बाकी असल्यानं जवळपास प्रत्येक संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला बाद फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक संघाला काय करावे लागेल आणि प्रत्येक संघ कशाप्रकारे उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, हे सांगू.
१. भारत
विजय : ६
पराभव : ०
नेट रन रेट : + १.४०५
उर्वरित सामने : श्रीलंका (२ नोव्हेंबर), दक्षिण आफ्रिका (५ नोव्हेंबर), नेदरलँड्स (१२ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सर्वात सोपा आहे. भारतानं बाकी ३ पैकी किमान १ जरी सामना जिंकला तरी त्यांचे १४ गुण होतील. ज्याद्वारे टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
- जर उरलेल्या ३ सामन्यांपैकी भारत एकही सामना जिंकू शकला नाही, तर इतर चार संघांपैकी (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान), जे १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्यापेक्षा भारताची धावगती सरस असली पाहिजे.
२. दक्षिण आफ्रिका
विजय : ५
पराभव : १
नेट रन रेट: + २.०३२
उर्वरित सामने : न्यूझीलंड (१ नोव्हेंबर), भारत (५ नोव्हेंबर), अफगाणिस्तान (१० नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- १४ गुण मिळवण्यासाठी उर्वरित ३ पैकी किमान २ सामने जिंका.
- उर्वरित ३ पैकी १ सामना जिंका आणि १२ गुणांपर्यंत पोहोचू शकणार्या इतर चार संघांपैकी (भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान) कमीत कमी एका संघापेक्षा चांगला रनरेट असू द्या.
- उरलेल्या ३ सामन्यांपैकी एकही नाही जिंकला, तर १० गुण मिळवू शकणाऱ्या इतर संघांपेक्षा चांगला रनरेट ठेवा.
३. न्यूझीलंड
विजय : ४
पराभव : २
नेट रन रेट : + १.२३२
उर्वरित सामने : दक्षिण आफ्रिका (१ नोव्हेंबर), पाकिस्तान (४ नोव्हेंबर), श्रीलंका (९ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- १४ गुणांसह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंका.
- उर्वरित ३ पैकी २ सामने जिंका आणि १२ गुणांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतर चार संघांपैकी (भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान) कमीत कमी एका संघापेक्षा चांगला रनरेट ठेवा.
- उरलेल्या ३ पैकी १ सामना जिंका आणि १० गुण मिळवू शकणार्या इतर संघांपेक्षा चांगला रनरेट ठेवा.
४. ऑस्ट्रेलिया
विजय : ४
पराभव : २
नेट रन रेट : + ०.९७०
उर्वरित सामने : इंग्लंड (४ नोव्हेंबर), अफगाणिस्तान (७ नोव्हेंबर), बांग्लादेश (११ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- उर्वरित सर्व ३ सामने जिंका आणि १४ गुणांसह पात्रता निश्चित करा.
- उर्वरित ३ पैकी २ सामने जिंका आणि १२ गुणांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतर चार संघांपैकी (भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान) किमान एका संघापेक्षा चांगला रनरेट असू द्या.
- उरलेल्या ३ पैकी १ सामना जिंका आणि १० गुणांपर्यंत पोहचू शकणाऱ्या इतर संघांपेक्षा चांगला रनरेट ठेवा.
५. पाकिस्तान
विजय : ३
पराभव : ४
नेट रन रेट : - ०.०२४
उर्वरित सामने : न्यूझीलंड (४ नोव्हेंबर), इंग्लंड (११ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- उर्वरित दोन्ही सामने जिंका आणि १० गुणांपर्यंत पोहचू शकणाऱ्या इतर संघांपेक्षा चांगला रनरेट ठेवा.
- उर्वरित २ सामन्यांपैकी १ सामना जिंकला तर, न्यूझीलंड आणि/किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांचे उरलेले ३ सामने गमाववे लागतील, अफगाणिस्तानला त्यांच्या उर्वरित ३ पैकी किमान २ गमावावे लागतील आणि पाकिस्तानला ८ गुणांपर्यंत पोहचू शकणाऱ्या इतर संघांपेक्षा चांगला रनरेट ठेवावा लागेल.
६. अफगाणिस्तान
विजय : ३
पराभव : ३
नेट रन रेट : -०.७१८
उर्वरित सामने : नेदरलँड्स (३ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया (७ नोव्हेंबर), दक्षिण आफ्रिका (१० नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- किमान १ सामना जिंकावा. आदर्शपणे उर्वरित तिन्ही सामने जिंकून १२ गुणांसह प्रवेश निश्चित करावा.
- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि/किंवा समान गुण असणाऱ्या इतर कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी रनरेट सुधारावा.
७. श्रीलंका
विजय : २
पराभव : ४
नेट रन रेट : - ०.२७५
उर्वरित सामने : भारत (२ नोव्हेंबर), बांग्लादेश (६ नोव्हेंबर), न्यूझीलंड (९ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- किमान २ सामने जिंका. आदर्शपणे जास्तीत जास्त १० गुण मिळविण्यासाठी उर्वरित सर्व ३ सामने जिंकावे.
- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि/किंवा समान गुण असणाऱ्या इतर कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा करणे आवश्यक.
- न्यूझीलंड आणि/किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान २ गमवावे लागतील.
८. नेदरलँड
विजय : २
पराभव : ४
नेट रन रेट : -१.२७७
उर्वरित सामने : अफगाणिस्तान (३ नोव्हेंबर), इंग्लंड (८ नोव्हेंबर), भारत (१२ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- किमान २ सामने जिंका. परंतु जास्तीत जास्त १० गुण मिळविण्यासाठी उर्वरित सर्व ३ सामने जिंका.
- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि/किंवा समान गुण पूर्ण करणाऱ्या इतर कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा करणे आवश्यक.
- न्यूझीलंड आणि/किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित ३ सामन्यांपैकी किमान २ गमावावे लागतील.
९. बांग्लादेश
विजय : १
पराभव : ६
नेट रन रेट : -१.४४६
उर्वरित सामने : श्रीलंका (६ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया (११ नोव्हेंबर)
बांग्लादेश कोणत्याही प्रकारे बाद फेरीसाठी पात्र ठरू शकत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर हा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
१०. इंग्लंड
विजय : १
पराभव : ५
नेट रन रेट : -१.६५२
उर्वरित सामने : ऑस्ट्रेलिया (४ नोव्हेंबर), नेदरलँड्स (८ नोव्हेंबर), पाकिस्तान (११ नोव्हेंबर)
उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग :
- ८ गुणांपर्यंत पोहचण्यासाठी उर्वरित सर्व ३ सामने जिंका.
- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि/किंवा ८ गुण मिळवलेल्या इतर संघाना मागे टाकण्यासाठी रनरेट वाढवा.
- न्यूझीलंड आणि/किंवा ऑस्ट्रेलियानं उर्वरित तीनही सामने गमावले पाहिजे.
- पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सपैकी एकाही संघाचे १० गुण नाही झाले पाहिजे.
हेही वाचा :