ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर विजय; पथुम निसांका म्हणाला, आश्वासक सुरुवातीनंतर हार पत्करल्यानं वाटते खंत - श्रीलंकेचा फलंदाज

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात झुंजार खेळी करणारा श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांकानं 67 चेंडूत 61 धावा केल्या.

Cricket World Cup 2023
श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 2:24 PM IST

लखनऊ Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेवर मात केली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात पाच गडी राखून विजय संपादन केला. या सामन्यात श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी जोरदार झुंज दिली. मात्र त्यांची झुंज व्यर्थ गेली. पथुम निसांकानं कुसल परेरासह 125 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांची झुंजार खेळी श्रीलंकेची हार रोखू शकली नाही. सामन्यानंतर पथुम निसांकानं 'आम्ही चांगली सुरुवात करुनही विजय मिळवू शकलो नाही, याची खंत वाटते' असं स्पष्ट केलं.

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर विजय : पाच वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियानं विश्वचषक सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पाच गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा डाव 209 धावांमध्येच गुंडाळला. त्यानंतर मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिस यांच्या जोरदार खेळीच्या बळावर श्रीलंकेवर सहज विजय मिळवला.

पथुम निसांका आणि कुसल परेराची खेळी व्यर्थ : श्रीलंकेचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पथुम निसांका यानं श्रीलंकेविरुद्ध जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. एकीकडं श्रीलंकेचा डाव कोसळत असताना पथुम निसांकानं कुसल परेरासोबत 125 धावांची भागीदारी केली. पथुम निसांकानं 67 चेंडूत 8 चौकारांसह 61 धावा केल्या. तर कुसल परेरानं 82 चेंडूत 78 धावा कुटत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. मात्र कुसल परेरा बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव 209 धावांमध्ये गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं.

आशादायक सुरुवातीनंतर हारल्यानं खंत : पथुम निसांकानं जोरदार खेळी करत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. पथुम निसाकांनं कुसल परेरासोबत चांगली भागीदारी केली. मात्र ही भागीदारी फोडल्यानंतर श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला. मात्र सामना संपल्यानंतर पतुम निसांकानं खंत व्यक्त केलं. आमची आश्वासक सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर आमचा डाव कोसळला, त्यामुळे खंत वाटते. आम्ही 210 धावापर्यंत मर्यादित राहिल्यानं हार पत्करावी लागली. मात्र आम्हाला 300 धावांचं लक्ष्य ठेवायला हवं होतं. मी संघ्यासाठी सारं काही दिलं, मात्र तरीही आम्ही कमी पडलो. मात्र आगामी सामन्यात आपण सर्वोत्तम खेळ करू' असं पथुम निसांका यानं सामन्यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : पाठीच्या दुखण्यानं अ‍ॅडम झाम्पा त्रस्त, तरीही श्रीलंकेच्या चार फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
  2. World Cup 2023 : पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक; रोहित शर्मावर मुश्ताक मोहम्मद यांनी उधळली स्तुतीसुमने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.