ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्ताननं केला आणखी एक उलटफेर, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं २८३ धावांचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९ षटकांत २ गडी गमावून सहज गाठलं.

Cricket World Cup 2023 PAK vs AFG
Cricket World Cup 2023 PAK vs AFG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 1:58 PM IST

Updated : Oct 23, 2023, 10:12 PM IST

चेन्नई Cricket World Cup २०२३ : विश्वचषक २०२३ च्या २२ व्या सामन्यात आज पाकिस्तान समोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या ५० षटकांत २८२-७ धावा झाल्या.

बाबर आझमचं अर्धशतक : प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली. सलामीवीर अब्दुल्ला शफीकनं चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. तो ७५ धावांत ५८ धावा करून बाद झाला. नूर अहमदनं त्याला पायचित केलं. दुसरा सलामीवीर इमाम उल हक १७ धावा करून परतला. त्यानंतर आलेला कर्णधार बाबर आझम या विश्वचषकात पहिल्यांदा लयीत दिसला. त्यानं एका टोकानं किल्ला लढवत ९२ चेंडूत ७४ धावा काढल्या. इफ्तिखार अहमद आणि शदाब खान यांनी ४०-४० धावांचं योगदान दिलं. पाकिस्ताननं ५० षटकांत ७ गडी गमावून २८२ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदनं ४९ धावा देत ३ बळी घेतले.

सहज लक्ष्य गाठलं : पाकिस्ताननं दिलेल्या २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या ओपनर्सनं धमाकेदार सुरुवात केली. रहमानउल्ला गुरबाजनं ५३ चेंडूत ६५ धावा ठोकल्या, तर इब्राहिम झदरननं ११३ चेंडूत ८७ रन्स केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी दमदार शतकीय भागेदारी केली. हे दोघं बाद झाल्यानंतर रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी यांनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजी चोपून काढत संघाला सहज विजय मिळवून दिला. रहमतनं ८४ चेंडूत ७७ धावा केल्या, तर शाहिदीनं ४५ चेंडूत ४८ धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हसन अलीनं १-१ विकेट घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

पाकिस्तान : इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शदाब खान, हसन अली, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नुर अहमद, नवीन-उल-हक

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : भारतानं रोखला न्यूझीलंडचा 'विजय'रथ; कोहलीचं शतक हुकलं, शमीच्या ५ विकेट्स
  2. Cricket World Cup २०२३ : शुभमन गिलनं रचला इतिहास, दिग्गज हाशिम आमलाचा 'हा' विक्रम मोडला
  3. Sachin Tendulkar Statue : उद्घाटनापूर्वीच पाहा वानखेडे स्टेडियमवरील सचिनचा पुतळा

Last Updated : Oct 23, 2023, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.