ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 NZ vs SL : सामना न्यूझीलंड-श्रीलंकेचा, मात्र पाऊस ठरु शकतो पाकिस्तानसाठी 'तारणहार', नेमकं समीकरण काय? - पाकिस्तान

Cricket World Cup 2023 NZ vs SL : विश्वचषकात आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून न्युझीलंडसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तसंच या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Cricket World Cup 2023 NZ vs SL
Cricket World Cup 2023 NZ vs SL
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 9:14 AM IST

बेंगळुरू Cricket World Cup 2023 NZ vs SL : विश्वचषकात आज अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरीतील चौथा संघ कोण असेल, याबाबतची अनिश्चितता आज बऱ्याच अंशी स्पष्ट होऊ शकते. आजचा सामना किवी संघानं मोठ्या फरकानं जिंकला तर उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चित होणार आहे. त्याच वेळी, थोड्या फरकानं विजय किंवा पराभव त्यांना उपांत्य फेरीतून बाहेर काढू शकतो. अशा स्थितीत न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय नोंदवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळविण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक : दुसरीकडं श्रीलंकेसाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरायचं असेल तर गुणतालिकेत अव्वल-8 मध्ये राहणे आवश्यक आहे. ते हे करू शकले नाही तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट गमवावं लागू शकतं. सध्या ते 8 सामन्यांत 2 विजय मिळवून नवव्या स्थानावर आहेत. टॉप-8 मध्ये येण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

आजच्या सामन्यात पावसाची शक्यता : आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या दिवशी, दुपारी 2 वाजता बंगळुरूमध्ये पाऊस पडू शकतो. दिवस जसजसा पुढं जाईल, तसतसा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारपासून बंगळुरूमध्ये रिमझिम पाऊस झाला. पावसाची शक्‍यता खरी ठरली तर पाकिस्तानसाठी ते खूप फायदेशीर ठरेल. जर आजचा न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळं वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. अशाप्रकारे उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या न्यूझीलंडला केवळ 9 गुण मिळू शकतील आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून पाकिस्तान 10 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचेल. ते चौथं उपांत्य फेरीचं स्थान मिळवतील. अफगाणिस्ताननंही दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर पाकिस्तानला अवघड जाणार नाही. कारण अफगाण संघाचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा कमी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय :

  • न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी/काईल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउथी/लॉकी फर्ग्युसन
  • श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टीरक्षक), सदिरा समराविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिष तिक्षिना, कसुन राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : इंग्लंडचा नेदरलॅंडवर मोठा विजय, बेन स्टोक्सचं शानदार शतक
  2. Cricket World Cup 2023 : भारत-पाकिस्तान उपांत्य सामना अद्यापही शक्य, कसा ते जाणून घ्या
  3. Cricket World Cup 2023 AUS vs AFG : अदभूत, अविश्वसनीय! 'संकटमोचक' मॅक्सवेलनं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.