बेंगळुरू Cricket World Cup 2023 NZ vs PAK : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा 35 वा सामना आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा सामना बाद फेरीसारखाच असणार आहे. कारण या सामन्यात कोणताही संघ हरला तरी त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास बंद होणार आहे.
-
Two thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbP
">Two thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbPTwo thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbP
दोन्ही सांघांची विश्वचषकातील स्थिती : न्यूझीलंडनं या विश्वचषकात चांगली सुरुवात करत सुरुवातीला सलग 4 सामने जिंकले होते. भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतरच न्यूझीलंड संघानं आपली लय गमावली. भारतानंतर न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने गमावले. आता त्यांचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरलाय. तर पाकिस्तान संघ सध्या 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर असून, त्यांना त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत. अशा परिस्थितीत हा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 115 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंडनं 51 सामने जिंकले आहेत तर पाकिस्ताननं 60 सामने जिंकले आहेत. या दोन संघांमधील 3 एकदिवसीय सामन्यांत कोणताही निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटलाय. तर एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात पाकिस्तानचा वरचष्मा राहिलाय. या कालावधीत पाकिस्ताननं 7 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडच्या खात्यात केवळ 2 विजय आहेत. दोन्ही संघ भारतात एकदाच आमनेसामने आले आहेत त्यात किवींनी बाजी मारली होती. गेल्या 5 वनडेत पाकिस्तान संघानं 4 मध्ये विजय मिळवला आहे तर एका सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवलाय.
देन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ
- न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन/काईल जेमिसन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा नेदरलॅंडवर शानदार विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकात तिकीटांचा काळाबाजार? 'बुक माय शो'च्या अधिकाऱ्यांना समन्स
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ; जाणून घ्या भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास