ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला लोळवलं, १४९ धावांनी मोठा विजय

Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा १४९ धावांनी दारूण पराभव केला. ८० चेंडूत ७१ धावा ठोकणाऱ्या ग्लेन फिलिप्सला सामनावीर पुरस्कारानं गोरवण्यात आलं.

Cricket World Cup 2023 NZ vs AFG
Cricket World Cup 2023 NZ vs AFG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 1:41 PM IST

Updated : Oct 18, 2023, 9:08 PM IST

चेन्नई Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आजच्या १६ व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा १४९ धावांनी दारूण पराभव केला.

अफगाणिस्तानचे फलंदाज अपयशी : न्यूझीलंडनं दिलेल्या २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही. रहमत शाहनं ६२ चेंडूत सर्वाधिक ३६ धावा केल्या. अजमातुल्ला ३२ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानचे बाकी सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसननं प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.

न्यूझीलंडच्या ५० षटकांत २८८ धावा : अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ५० षटकांत २८८-६ धावा झाल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं ८० चेंडूत सर्वाधिक ७१ धावा केल्या. तर कर्णधार टॉम लॅथमनं ७४ चेंडूत ६८ धावांचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हक आणि अजमातुल्ला ओमरझाई यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

केन विल्यमसन दुखापतीमुळे बाहेर : या सामन्यात न्यूझीलंडच्या टीममध्ये नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या जागी विल यंगला संधी मिळाली होती. तर अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. तो अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळं सुमारे एक महिना स्पर्धेतून बाहेर पडलाय. उभय संघांनी आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने किवी संघानं जिंकले. हे दोन्ही सामने विश्वचषकात खेळले गेले आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन :

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमातुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 NZ vs AFG : अफगाणिस्तानच्या 'फिरकी त्रिकूटाचं' न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान
  2. PCB Complaint To ICC : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, चाहत्यांसाठी व्हिसा नाकारल्याबद्दल निषेध नोंदवला
  3. Cricket World Cup २०२३ : गतविजेत्या इंग्लंडवर मोठी नामुष्की, कमकुवत अफगाणिस्ताननं धूळ चारली

Last Updated : Oct 18, 2023, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.