ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 IND vs NZ : विराटनं विक्रमी खेळी करुनंही सोशल मिडियावर ट्रोल, चाहत्यांना राग अनावर; नेमकं घडलं तरी काय? - Virat Kohli fourth highest run scorer

Cricket World Cup 2023 IND vs NZ : भारतानं कालच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत आपली विजयी मालिका कायम ठेवलीय. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा विराट कोहली मात्र आपल्या कृतीमुळं सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल झालाय.

Cricket World Cup 2023 IND vs NZ
Cricket World Cup 2023 IND vs NZ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 7:32 AM IST

Updated : Oct 23, 2023, 8:23 AM IST

शिमला (धर्मशाळा) - Cricket World Cup 2023 IND vs NZ : विश्वचषक सामन्यात 20 वर्षांनंतर भारतीय संघानं न्यूझीलंडचा रविवारी पराभव केला. साखळी फेरीतील सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं न्यूझीलंडला 4 गडी राखून मात दिली. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलच्या 130 धावांच्या खेळीमुळं भारताला 274 धावांचं आव्हान मिळालं. प्रत्युत्तरात भारताकडून विराट कोहलीनं धावांचा पाठलाग करताना 95 धावांची महत्त्वपुर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. तसंच एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोहली आता सर्वाधिक धावा काढणारा चौथा फलंदाज ठरलाय. परंतु, संघाच्या विजयाचा हिरो सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याचं दिसून आलंय. सामन्यात दोन-तीन वेळा असा प्रसंग घडले की क्रिकेटप्रेमी संतप्त झाले.

सूर्याचा रन-आऊट : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा विराट कोहलीच्या चुकीनं रनआऊट झाल्यानं चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. विश्वचषकात पहिलाचं सामना खेळणारा सूर्या 33 व्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यानंतर त्यानं फटका मारत एक धाव काढण्यासाठी आवाज दिला. विराटही धाव घ्यायला निघाला. पण सूर्यकुमार अर्ध्यात पोहोचूनही विराटनं धाव घेण्यास नकार दिला. त्यावेळी सूर्यकुमार अगदी नॉन स्ट्राईकच्या जवळ पोहोचला होता. पण विराट पिचवर सेट असल्यानं सूर्यानं आपल्या विकेटचं बलिदान दिलं. यामुळं सोशल मिडियावर एक्समध्ये (पूर्वीचे ट्विट) विराटवर टीका होतेय.

रविंद्र जडेजाला धाव घेण्यास नाकारलं : भारताला सामना जिंकण्यासाठी जास्त चेंडूत कमी धावांची आवश्यकता होती. तेव्हा रविंद्र जडेजा एकेरी आणि दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. सामना लवकर संपवून नेट रनरेटमध्ये फायदा करण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र, एका वेळी सहजपणे दोन धावा मिळत असतानाही विराटनं दुसऱ्या धावेसाठी नकार देत स्वत:कडं स्ट्राईक ठेवली. त्याच्या या कृतीमुळं जडेजानंही मैदानात उघड नाराजी व्यक्त केली होती. तसंच यामुळं नेटकऱ्यांनी विराटच्या कृतीवर आक्षेप घेतला.

शतकाच्या प्रयत्नात कोहली 95 धावांवर बाद : शतकाच्या जवळ आला आसताना विराटन धावांची गती संथ केली. तसंच स्ट्राईक स्वत:कडं राहावी यासाठी जडेजाला एकेरी धावही नाकारली. त्यानंतर एक मोठा फटका मारत सामना संपवत आपलं शतक पूर्ण करावं असा विराटचा विचार होता. पण त्याचा फटका चुकला. त्यानंतर 95 धावांवर आऊट झाला. त्याच्या आऊट होण्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी पोस्ट करत त्याच्यावर टीकेची झोड उठवली.

कोहलीनं जयसूर्याला टाकलं मागे : विराट कोहलीनं कालच्या सामन्यात श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याला (13,430 धावा) मागं टाकून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनलाय. विराटनं 286 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93.69 च्या स्ट्राइक रेट व 58.16 च्या सरासरीनं 13,437 धावा केल्या आहेत. तसंच त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 शतकं आणि 69 अर्धशतकं केली आहेत, ज्यात 183 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. सचिन तेंडुलकर (18,426 धावा) वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्‍यानं 49 शतकं केली आहेत. ही आजपर्यंतची वनडेमध्ये सर्वाधिक शतकं आहेत.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : भारतानं रोखला न्यूझीलंडचा 'विजय'रथ; कोहलीचं शतक हुकलं, शमीच्या ५ विकेट्स
  2. Cricket World Cup २०२३ : शुभमन गिलनं रचला इतिहास, दिग्गज हाशिम आमलाचा 'हा' विक्रम मोडला
  3. Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात दिसली मोहम्मद शमीची जादू, अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Last Updated : Oct 23, 2023, 8:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.