ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : भारतानं साहेबांची जिरवली, 'विश्वविजेते' स्पर्धेतून बाहेर!

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३४.५ षटकांत १२९ धावांवर ऑलआऊट झाला. १०१ चेंडूत ८७ धावा ठोकणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला.

Cricket World Cup 2023 IND vs ENG
Cricket World Cup 2023 IND vs ENG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 1:44 PM IST

Updated : Oct 29, 2023, 9:52 PM IST

लखनऊ Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आज लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर यजमान भारत आणि गतविजेता इंग्लंड यांच्यात लढत झाली. या सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडवर १०० धावांनी दिमाखदार विजय मिळवला. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतानं ५० षटकांत २२९-९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३४.५ षटकांत सर्वबाद केवळ १२९ धावांचं करू शकला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडची गोलंदाजी : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय काही प्रमाणात योग्यही ठरला. सलामीवीर शुभमन गिल केवळ ९ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही. त्याला बेन स्टोक्सनं बाद केलं. त्यानंतर आलेला अय्यरही ४ धावा करून बाद झाला. एकवेळ भारताची स्थिती अत्यंत खराब झाली होती. मात्र त्यानंतर आलेल्या केएल राहुलनं रोहित शर्मासोबत मिळून भारताचा डाव सावरला.

रोहित मदतीला धावून आला : या दोघांनी मिळून अर्धशतकीय भागेदारी केली आणि डावाला आकार दिला. दरम्यान, रोहितनं विश्वचषकातील आपलं आणखी एक अर्धशतक साजरं केलं. रोहित १०१ चेंडूत ८७ धावा करून बाद झाला. राहुलंही ५८ चेंडूत ३९ धावा करून परतला. त्यानंतर विश्वचषकात आपला दुसरा सामना खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवनं क्रिजवर येऊन भारताला नामुष्कीतून वाचवलं. तो विश्वचषकातील आपल्या पहिल्या अर्धशतकापासून केवळ १ धाव दूर राहिला. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतानं २२९ धावांच्या सन्मानजनक आकड्यापर्यंत मजल मारली.

शमीची धारदार गोलंदाजी : २३० धावांचं छोटं लक्ष्य इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासाठी किरकोळ होतं. मात्र भारतीय संघानं सुरुवातीपासूनचं साहेबांना धक्के देण्यास सुरुवात केल्यानं त्यांची गाडी रुळावरून घसरली, ती कायमचीचं! त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रुट पहिल्या चेंडूवर पायचित झाला. बुमराहनं त्याची विकेट घेतली. भरवश्याचा बेन स्टोकही भोपळा न फोडता परतला. इंग्लंडकडून लिव्हिंगस्टोननं ४६ चेंडूत सर्वाधिक २७ धावाचं योगदान दिलं. भारताकडून शमीनं पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी करत २२ धावा देत ४ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर (कर्णधार/ यष्टिरक्षक), लियम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : बांग्ला टायगर्सचा लाजिरवाणा पराभव, नेदरलँडनं एकतर्फी सामना जिंकला

Last Updated : Oct 29, 2023, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.