बेंगळुरु Cricket World Cup 2023 ENG vs SL : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेनं गतविजेत्या इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 10 गडी गमावून केवळ 156 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघानं सहज लक्ष्य गाठले. श्रीलंकेनं 25.4 षटकात केवळ 2 गडी गमावून 160 धावा केल्या. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकानं 77 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय सदिरा समरविक्रमानं 65 धावांची खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीनं श्रीलंकेच्या दोन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली.
डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टोची 45 धावांची भागीदारी : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली होती. डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो यांनी मिळून 6.3 षटकात 45 धावांची भागीदारी केली. अँजेलो मॅथ्यूजनं मलानला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडं झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मलाननं सहा चौकारांच्या मदतीनं 28 धावा केल्या.
बेन स्टोक्सने केल्या सर्वाधिक धावा : इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. तर श्रीलंकेकडून लाहिरू कुमारानं सर्वाधिक 3 बळी घेतले. दोन्ही संघांनी आतापर्यंत ४-४ सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. विश्वचषक 2023 पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका संघ चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. कर्णधार जोस बटलर 8 धावा करून बाद झाला. आजचा सामना हरणारा संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले आहे. विश्वचषक 2023 पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका संघ चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा : इंग्लंडला दुसरा धक्का जो रूटच्या रूपानं बसला, जो तीन धावा करून मॅथ्यूजच्या थ्रोवर बाद झाला. यानंतर कसून राजितानं दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टोची मोठी विकेट घेतली. बेअरस्टोनं 31 चेंडूंत 30 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे. इंग्लिश चाहत्यांना जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण लाहिरू कुमाराच्या चेंडूवर त्यानं केवळ 8 धावा केल्या. बटलरनंतर इंग्लंडनं लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अलीची विकेटही गमावली.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : इंग्लंड आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 78 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडनं 38 तर श्रीलंकेनं 36 सामने जिंकले आहेत. या दोन संघांमधील 3 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही तर 1 सामना अनिर्णित राहिला. या दोन संघांमधील एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सामन्यांवर नजर टाकली तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 11 वेळा सामना झालाय. यात इंग्लंडनं 6 तर श्रीलंकेनं 5 सामने जिंकले आहेत. यामुळं या दोन्ही संघात काटे की टक्कर असल्याचं पहायला मिळतंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी इंग्लंड संघात 3 तर श्रीलंका संघात 2 बदल करण्यात आले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रुट, बेन स्टोक्स, लियम लिव्हिंगस्टोन, जॉस बटलर (कर्णधार/ यष्टिरक्षक), मोईन अली, क्रीस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड
श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टिरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अॅंजेलो मॅथ्यूज, लहिरु कुमारा, महेश थीक्षाना, दिलशान मदुशंका, कसून रजिथा