धर्मशाळा Cricket World Cup 2023 AUS vs NZ : धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएन स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात तब्बल 32 षटकारांचा पाऊस पडला. तसंच या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 771 धावा केल्या आहेत. यासह या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले.
-
Travis Head announced himself at #CWC23 in style 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📺 Watch highlights: https://t.co/L6d1AM2CRa pic.twitter.com/c9kK9a1wRN
">Travis Head announced himself at #CWC23 in style 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023
📺 Watch highlights: https://t.co/L6d1AM2CRa pic.twitter.com/c9kK9a1wRNTravis Head announced himself at #CWC23 in style 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023
📺 Watch highlights: https://t.co/L6d1AM2CRa pic.twitter.com/c9kK9a1wRN
विश्वचषक इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा : सलामीविर डेविड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड, ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 49.2 षटकांत 388 धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडनंही रचिन रवींद्रचं शतक, जेम्स निशमच्या आक्रमक खेळीच्या बळावर 9 बाद 383 धावा केल्या. यामुळं या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 771 धावा केल्या. या दरम्यान 32 षटकार आणि 65 चौकारांचा पाऊसही पडला.
-
An all-time classic in Dharamsala 😲
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
✅ Most runs ever in a CWC match!
✅ Another century for Ravindra!
✅ Head hits terrific ton on return!
Read the full report as Australia beat New Zealand by just five runs ⬇️#CWC23 #AUSvNZhttps://t.co/Sm3HOVNhWH
">An all-time classic in Dharamsala 😲
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023
✅ Most runs ever in a CWC match!
✅ Another century for Ravindra!
✅ Head hits terrific ton on return!
Read the full report as Australia beat New Zealand by just five runs ⬇️#CWC23 #AUSvNZhttps://t.co/Sm3HOVNhWHAn all-time classic in Dharamsala 😲
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 28, 2023
✅ Most runs ever in a CWC match!
✅ Another century for Ravindra!
✅ Head hits terrific ton on return!
Read the full report as Australia beat New Zealand by just five runs ⬇️#CWC23 #AUSvNZhttps://t.co/Sm3HOVNhWH
विश्वचषकात एका सामन्यात सर्वाधिक धावा :
- 771 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला - 2023
- 754 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली - 2023
- 714 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉटिंगहॅम - 2019
- 688 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी - 2015
- 682 - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, नॉटिंगहॅम - 2019
- 676 - भारत विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू - 2011
सलग तीन सामन्यात 350 हून अधिक धावा करणारा पहिला संघ : शनिवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडविरुद्ध 388 धावा केल्या. यासोबतच विश्वचषकाच्या इतिहासात सलग तीन सामन्यांत 350 हून अधिक धावा करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरलाय. सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियानं नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 50 षटकांत 8 बाद 399 धावा केल्या होत्या. तर त्यापुर्वीच्या पाकिस्तानविरुद्धही त्यांनी आपल्या 50 षटकांत 9 बाद 367 धावा केल्या होत्या.
विश्वचषकाच्या पदार्पणात सर्वात जलद शतक : सामन्यात विश्वचषकातील पहिला सामना खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडनं डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला 150 धावांची शानदार भागीदारी केली. यासोबतच हेडनं पदार्पणाच्याच सामन्यात दोन नवीन विक्रम केले. ट्रॅव्हिस हेड यंदाच्या विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त पहिला फलंदाज बनलाय. त्यानं अवघ्या 25 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. त्यापूर्वी श्रीलंकेच्या कुसल मेंडिसनंही 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. तसंच ट्रॅव्हिस हेड पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरलाय. त्यानं अवघ्या 59 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडत 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र शतक झाल्यावर तो 109 धावांवर बाद झाला.
- विश्वचषकात न्युझीलंदविरुद्ध सर्वाधिक धावा : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाळा इथं काल झालेल्या विश्वचषकाच्या 27 व्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या, जी एकदिवसीय विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा :