नवी दिल्ली Cricket World Cup 2023 AUS vs NED : विश्वचषकातील 24 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड त्यांच्या पाचव्या सामन्यासाठी आमनेसामने येतील. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांतून 2 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर नेदरलँड्स 4 सामन्यांतून एका विजयासह सातव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत आपलं स्थान मजबूत करण्याकडे दोन्ही संघांचं लक्ष असेल.
विजयामुळं ऑस्ट्रेलिया आत्मविश्वासात : मागील सामन्यात बंगळुरूमध्ये कांगारूंनी पाकिस्तानवर 62 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 367 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर अॅडम झाम्पानं चार विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला 45.3 षटकांत 305 धावांत गुंडाळलं. या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
-
A Delhi-cious contest on the cards as we go up against the Aussies tomorrow. 👊#CWC23 pic.twitter.com/ebQJzTS21H
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A Delhi-cious contest on the cards as we go up against the Aussies tomorrow. 👊#CWC23 pic.twitter.com/ebQJzTS21H
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 24, 2023A Delhi-cious contest on the cards as we go up against the Aussies tomorrow. 👊#CWC23 pic.twitter.com/ebQJzTS21H
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 24, 2023
नेदरलँड्सची अवस्था काय : दुसरीकडे, नेदरलँड्सला श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील संघानं प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 262 धावा केल्या आहेत. दरम्यान, श्रीलंकेनं 10 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं. मात्र, या विश्वचषकात नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाचा पराभव केलाय. सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया यां संघांमध्ये आत्तापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियानं बाजी मारलीय.
खेळपट्टी कशी असेल : खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. या स्टेडियमची खेळपट्टी कोरडी असून मैदान लहान आहे. त्यामुळं फलंदाजांना सहज चौकार मारण्यास मदत मिळते. जसजसा सामना पुढं जाईल तसतशी खेळपट्टी कोरडी होत जाईल. त्यामुळं फिरकीपटूंना मदत होईल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम अनेकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, असं मागील काही सामन्यांत पहायला मिळासंय.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (यष्टिरक्षक), ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), अॅडम जम्पा, जोश हेजलवुड
- नीदरलैंड : विक्रमजीत सिंग, मैक्स ओ'डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टिरक्षक/ कर्णधार), लॉगान वैन बीक, रूलोफ वैन डेर मेरवे, आर्यन दत्त, पॉल वैन मीकेरेन
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्तान आता कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, पाकिस्तानवरील विजय अनपेक्षित नव्हता - पटवाल
- Cricket World Cup २०२३ : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, महमुदुल्लाचं शतक व्यर्थ
- Cricket World Cup 2023 IND vs NZ : विराटनं विक्रमी खेळी करुनंही सोशल मिडियावर ट्रोल, चाहत्यांना राग अनावर; नेमकं घडलं तरी काय?