ETV Bharat / sports

Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : 'विराट' पराक्रमानंतर अनुष्काची खास पोस्ट, पतीचं केलं भरभरून कौतुक

Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावत विश्वविक्रम केलाय. यानंतर त्याची पत्नी अनुष्कानं त्याच्यासाठी आपल्या इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी शेअर केलीय. तसंच या कामगिरीबद्दल विराटचं अनेक दिग्गजांनी अभिनंदन केलंय.

Anushka Sharma Showers Praises Virat Kohli

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 8:58 AM IST

हैदराबाद Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानं जल्लोषाचं वातावरण आहे. या आनंदाच्या प्रसंगात भर घालत, विराट कोहलीनं बुधवारच्या सामन्यात एक उल्लेखनीय टप्पा गाठलाय. त्यानं त्याचं 50 वे एकदिवसीय शतक झळकावलं आणि एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक शतकांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं त्याच्या या कर्तृत्वाबद्दल तिचं कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक खास स्टोरी टाकलीय.

  • अनुष्कानं स्टोरीत काय लिहिलंय : अनुष्कानं तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये लिहिलंय की, 'देव हा सर्वोत्तम पटकथा लेखक आहे. तुझ्या प्रेमानं मला आशीर्वाद दिल्याबद्दल आणि वर्षानुवर्षे त्याची वाढ आणि यश पाहिल्याबद्दल देवाचे आभार. स्वतःशी आणि खेळाशी प्रामाणिक राहण्यासाठी तु खरोखरचं देवाचा मुलगा आहेस. अशा शब्दांत अनुष्कानं आपला पती विराटचं कौतुक केलय.
  • संपूर्ण सामन्यात अनुष्कानं केलं चिअर : संपूर्ण सामन्यात, अनुष्कानं तिच्या पतीची सर्वात मोठी चीअरलीडर म्हणून चांगलाच पाठिंबा दर्शवला. तिनं स्टँडवरून विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघासाठी उत्कटतेनं चीअर केलं. विराटनं शतक ठोकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर निखळ आनंद आणि उत्साह होता.

अनेक दिग्गजांकडून कोहलीचं अभिनंदन : भारतीय फलंदाज विराट कोहलीनं बुधवारी आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावत एक विक्रम प्रस्थापित केलाय. या विश्वविक्रमानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं त्याच्या खास शैलित त्याचं कौतूक केलंय. यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बीसीसीआसचे सचिव जय शाहा, माजी क्रिकेटपटू सौरव गांगूली, यासह अनेक दिग्गजांनी विराट कोहलीवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

हेही वाचा :

  1. IND vs NZ Semifinal Records : वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 'बुलेट ट्रेन'च्या वेगानं मोडले 'हे' विक्रम, आता वर्ल्ड कप राहणार लक्ष्य
  2. Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं न्यूझीलंडला लोळवलं, शमीच्या भेदक माऱ्यासमोर किवीजची शरणागती; अंतिम फेरीत धडक
  3. Babar Azam : विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमचा मोठा निर्णय, पाकिस्तानचं कर्णधारपद सोडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.