हैद्राबाद ICC World CUP 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 साठी रविवारी धर्मशाला येथे भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाचा उपकर्णधार टॉम लॅथमनं पत्रकार परिषद आपली भूमीका स्पष्ट केलीय. यावेळी तो म्हणाला की, भारतीय संघ महान आहे. या विश्वचषकात भारतीय संघानं आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा स्थितीत धर्मशाला येथे रविवारी महत्त्वाच्या लढतीत उभय संघांमध्ये स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद न्यूझीलंड संघात असल्याचेही तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
न्यूझीलंडला भारतात खेण्याचा अनुभव : आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतातील चेन्नई संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळं त्यांना भारतातील खेळपट्ट्या, हवामानाचा भरपूर अनुभव आहे. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी दाखवली होती, असं टॉम लॅथमनं म्हटलं आहे. इंग्लंडचे खेळाडू चांगले खेळत आहेत. त्याचबरोबर आता भारतात खेळण्याचा अनुभवाचाही आम्हा खूप फायदा होत आहे, असं टॉम लॅथमनं सांगितलं. जेव्हा-जेव्हा आयसीसीच्या स्पर्धेत भारतासोबत सामना होतो, तेव्हा-तेव्हा स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या युगात जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद न्यूझीलंडमध्ये आहे. भारतात पूर्णपणे वेगळी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत आम्ही पूर्ण उर्जेने खेळू, असं टॉम लॅथम यांनी म्हटलं आहे.
भारतीय संघ आक्रमक : 'या' सामन्यात आमचा चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. भारताच्या टॉप खेळाडूनं आतापर्यंत महत्त्वाची कामगिरी दाखवली आहे. तसंच भारतीय संघाची गोलंदाजी देखील आक्रमण, उत्कृष्ट आहे. त्याचप्रमाणं न्यूझीलंडचा संघही पूर्णपणे लयीत आहे. धर्मशालाचं आऊटफिल्ड सामान्य आहे. त्यामुळं आता आम्हाला सावधपणे खेळावं लागेल. त्यामुळं आम्हीही हे लक्षात घेऊन संघ नियोजन करत आहोत. अफगाणिस्तानविरुद्धचा मोठा विजय भारताविरुद्ध खेळण्यासाठी खूप मदत करेल. भारताकडं चांगली फलंदाजी, गोलंदाजी आहे. त्यामुळं हा सामना उत्तम होईल.
हेही वाचा -