माउंट मौनगानुई : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup ) स्पर्धेतील चौथा सामना पार पडला. हा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 107 धावांनी धूळ चारली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 244 धावा केल्या. याला प्रत्युतर देताना पाकिस्तानचा संघ 137 धावांवर गारद झाला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( India first batting decision ) घेतला होता. त्यानुसार भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 244 धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मंधाना 52, दीप्ती शर्मा 40, स्नेहा राणा नाबाद 53 आणि पुजाच्या 67 धावांच्या जोरावर ही धावसंख्या उभारली होती. पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना निदा दार आणि नशरा संधूने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इतर गोलंजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
-
That's that from #INDvPAK game at #CWC22.
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Pakistan are bowled out for 137 in 43 overs.#TeamIndia WIN by 107 runs.
Scorecard - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/jmP7xCPowi
">That's that from #INDvPAK game at #CWC22.
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
Pakistan are bowled out for 137 in 43 overs.#TeamIndia WIN by 107 runs.
Scorecard - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/jmP7xCPowiThat's that from #INDvPAK game at #CWC22.
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
Pakistan are bowled out for 137 in 43 overs.#TeamIndia WIN by 107 runs.
Scorecard - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/jmP7xCPowi
पाकिस्तान संघ 245 धावांचा पाठलाग करायला उतरला असता त्यांची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानने आपले पाच फलंदाज 22 षटकांत 70 धावांवर गमावले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर देखील भारतीय संघाने आपल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचा गळा आवळला. पाकिस्तानच्या एका ही फलंदाजाला या सामन्यात अर्धशतक लगावता आले नाही.
पाकिस्तान कडून सर्वाधिक धावा सिद्रा अमिनने केल्या. तिने आपल्या खेळीत 64 चेंडूचा सामना करताना 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने आपल्या 10 षटकांत 31 धावा 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर झुलन गोस्वामी आणि स्नेहा राणाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
-
What a show with the ball for Gayakwad 💥💥
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Finishes with figures of 4/31.
Live - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/Pau5dLpf4b
">What a show with the ball for Gayakwad 💥💥
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
Finishes with figures of 4/31.
Live - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/Pau5dLpf4bWhat a show with the ball for Gayakwad 💥💥
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
Finishes with figures of 4/31.
Live - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/Pau5dLpf4b
मितालीने मोडला सचिनचा विक्रम
मिताली राज वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळली आहे. तर दोन वर्ल्डकप फायनलमध्ये संघाचे नेतृत्व करणारी ती जागतिक महिला क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच, वर्ल्डकपमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करणारी ती भारताची पहिली आणि जगातील पाचवी क्रिकेटपटू आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिने उत्तम कामगिरी केली नसेल. मात्र, तिन एक नवीन विक्रम रचला आहे. ती सर्वाधिक वर्ल्डकप खेळणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. मितालीने महान क्रिकेकपटू सचिन तेंडुलकरशी बरोबरी साधली आहे. सचिन तेंडुलकरने त्यांच्या करियर मध्ये सहा सहा वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. मितालीचाही हा सहावा वर्ल्डकप आहे.
हेही वाचा - IND VS SL 1st : 175 रन आणि 8 विकेट, जाडेजाच्या उल्लेखनीय कामगिरीने 'लंका'दहन