ETV Bharat / sports

ICC Women ODI Player Rankings: आयसीसीची महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर; स्मृती मंधाना टॉप-10 मध्ये परतली

आयसीसीच्या ताज्या महिला एकदिवसीय क्रमवारीत ( ICC Women's ODI Rankings ) फलंदाज स्मृती मंधानाला फायदा झाला आहे. मंधाना आता पुन्हा एकदा ( Batsman Smriti Mandhana ) फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये परतली आहे. ही क्रमवारी आयसीसीने मंगळवारी जाहीर केली आहे.

Smriti Mandhana
Smriti Mandhana
author img

By

Published : Mar 22, 2022, 5:55 PM IST

हैदराबाद: आयसीसीने मंगळवारी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील ताजी क्रमवारी ( Latest rankings in women's ODI cricket ) जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय फलंदाज स्मृती मंधानाला फायदा ( Smriti Mandhana benefits in ranking ) झाला आहे. स्मृती मंधानाने टॉप-10 खेळाडूमध्ये पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर कर्णधार मिताली राज एका स्थानाचा फटका बसला आहे. तसेच हरमनप्रीत कौरला एक स्थानाचा फायदा झाला आहे.

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत, मंधाना आता पुन्हा एकदा फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये परतली आहे. मंधानाचे 663 रेटिंग गुण ( Smriti Mandhana 663 rating points ) आहेत आणि आता ती एका स्थानाने सुधारून 10 व्या क्रमांकावर आली आहे. त्याचबरोबर कर्णधार मिताली राजला एका स्थानाचा फटका बसला असून तिची सातव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

मंधाना याआधी टॉप-10 मधून बाहेर पडली होती. मात्र आता तिने पुन्हा त्यात स्थान मिळवले आहे. मंगळवारी तिने बांगलादेशविरुद्ध 30 धावा केल्या होत्या. फलंदाजांच्या यादीत मंधाना व्यतिरिक्त फक्त कर्णधार मिताली राज टॉप-10 मध्ये ( Captain Mithali Raj top-10 ) राहिली आहे. तिचे 696 रेटिंग गुण आहेत.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची वेगवान आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीला ( Veteran bowler Jhulan Goswami ) देखील नुकसान झाले आहे. झुलन एका स्थानाने घसरुन सातव्या क्रमांकावर आली आहे. तिच्याकडे आता तिच्याकडे 674 रेटिंग गुण आहेत. परंतु ती टॉप-10 मध्ये कायम आहे. स्नेह राणाने बांगलादेश विरुद्ध चार विकेट्स घेतल्याने ती आपल्या 49 व्या स्थानावर कायम आहे. तर दीप्ती शर्मा 17व्या तर राजेश्वरी गायकवाड 14व्या क्रमांकावर आहेत.

इतर संघांच्या खेळाडूंमध्ये फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची एलिस हीली 730 रेटिंगसह ( Alice Healy 730 rating ) अव्वल स्थानावर आहे. हीलीची देशबांधव बेथ मुनी दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉलवॉर्ट तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन पहिल्या, ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन दुसऱ्या आणि तिची देशबांधव मेगन शट्टी तिसऱ्या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.