ETV Bharat / sports

ICC Test Rankings : क्रमवारीत ऋषभ पंतची पाचव्या स्थानी झेप, तर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर

author img

By

Published : Jul 6, 2022, 5:30 PM IST

बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंत कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानावर पोहोचला ( Rishabh Pant jumped to fifth position ) आहे. खराब फॉर्मशी झुंज देत असलेला विराट कोहली सहा वर्षांत प्रथमच टॉप-10 मधून बाहेर पडला.

virat rishabh
विराट ऋषभ

लंडन: टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावल्यानंतर, प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली खराब कामगिरीमुळे तीन स्थानांनी घसरून टॉप-10 मधून बाहेर पडला ( Virat Kohli out of the top-10 ) आहे.

पंतने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 111 चेंडूत 146 धावा करत भारताची स्थिती मजबूत केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात 57 धावा केल्या. मागील सहा कसोटी डावांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह पंतच्या अलीकडच्या फॉर्ममुळे त्याला कसोटी फलंदाजी क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर नेले आहे. त्याने सहा स्थानांनी झेप घेत तो पाचव्या स्थानावर ( Rishabh Pant jumped to fifth position ) आला आहे.

एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध केवळ 11 आणि 20 धावा करणारा विराट कोहली आयसीसी पुरुषांच्या कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत टॉप-10 मधून बाहेर पडला. बेअरस्टोने नाबाद 114 धावांच्या खेळीने इंग्लंडला भारतावर शानदार विजय मिळवून दिला आणि आता कसोटी फलंदाजी क्रमवारीत 11 स्थानांनी प्रगती करत दहाव्या स्थानावर ( Johnny Bairstow in 10th place ) पोहोचला आहे.

32 वर्षीय खेळाडू त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने शेवटच्या तीन कसोटींमध्ये चार शतके ठोकली आहेत. त्याने भारताविरुद्धच्या पुनर्निर्धारित कसोटीत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. बेअरस्टोने सध्याच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये सहा शतकांसह 55.36 च्या सरासरीने 1218 धावा केल्या आहेत. जो रूटने क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. एजबॅस्टन येथे धावांचा पाठलाग करताना नाबाद शतकाने, त्याला त्याच्या सर्वोच्च रेटिंग पॉईंट (923) वर नेले. यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार ( Former captain Joe Root ) आयसीसी रँकिंगच्या इतिहासातील टॉप 20 सर्वोच्च रेट केलेल्या फलंदाजांच्या विशेष यादीत आला.

जेम्स अँडरसनने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात पाच विकेट्स घेऊन इंग्लंडला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावली. तीन कसोटींमध्ये त्याच्या नावी 17 बळी आहेत. वेगवान गोलंदाज कसोटी गोलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने पुढे सरकत सहाव्या स्थानावर ( James Anderson in 6th place ) पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नऊ विकेट्स घेतल्यामुळे नॅथन लिऑन 13व्या स्थानावर आहे. कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही, मात्र ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने तीन स्थानांनी झेप घेत 14व्या स्थानावर आला आहे.

हेही वाचा - IND vs WI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शिखर धवन सांभाळणार नेतृत्वाची धुरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.