ETV Bharat / sports

India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, 'हे' आहे कारण - विश्वचषक २०२३

विश्वचषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक ती कारवाईही सुरू केली आहे.

India Vs Pakistan
भारत विरुद्ध पाकिस्तान
author img

By

Published : Jul 26, 2023, 9:18 PM IST

पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : भारतात क्रिकेट विश्वचषकाला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. तर 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आता या सामन्याच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या गरबा नाईटच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक ती कारवाईही सुरू केली आहे.

15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात : 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र त्याच दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये गरबा नाइट साजरी केली जाते. त्यामुळे एकाचदिवशी दोन मोठे कार्यक्रम झाल्यास लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आणि सुरक्षेच्या दृष्टीने 15 ऑक्टोबर रोजी गरबा नाईटचे आयोजन करण्यात अडचण येऊ शकते. यासोबतच लॉजिस्टिक लेव्हलच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. हे टाळण्यासाठी बीसीसीआयने हा पुढाकार घेतला आहे. यासाठी बीसीसीआय आयसीसीशी बोलून सामन्याच्या तारखा बदलण्याचा विचार करू शकते.

अहमदाबाद आणि आसपासच्या परिसरात बुकिंग फुल्ल : 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख निश्चित होताच अहमदाबाद आणि आसपासच्या परिसरात हॉटेल रूम, विमानाची तिकिटे, रेल्वे तिकीट यांचे बुकिंग सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, हॉटेलमध्ये रूम उपलब्ध नसल्यामुळे लोकांनी हॉस्पिटलमध्येही बेड बुक करण्यास सुरुवात केली होती.

चाहत्यांचे आर्थिक नुकसान : अहमदाबादमधील बहुतेक हॉटेल्स आणि लॉज मॅचच्या तारखांचा विचार करून आधीच बुक करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तारखा बदलल्या तर पुन्हा एकदा नव्या तारखांसाठी लोकांना संघर्ष करावा लागणार आहे. त्याचवेळी बुकिंग रद्द केल्याने चाहत्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते.

नरेंद्र मोदीं स्टेडियममध्ये 4 मोठे सामने : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचे 4 मोठे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यानंतर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळवण्याची योजना आखण्यात आली असून, त्यात बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. या मैदानावर तिसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 4 नोव्हेंबरला होणार आहे. याशिवाय याच स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.

हेही वाचा :

  1. IND Vs PAK : भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांना मिळेना रूम, आता चक्क हॉस्पिटलमध्ये बुकींग सुरु!
  2. Hockey India : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हॉकी संघाची घोषणा, हरमनप्रीत सिंगकडे संघाचे नेतृत्व
  3. Rinku Singh : आशियाई क्रीडा स्पर्धेत रिंकू सिंह असणार टीम इंडियाचा हुकुमी एक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.