दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) मंगळवारी वेस्ट इंडिज द्वारे कॅरेबियन येथे 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकाचे यजमानपदासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ज्याची सांगता भारताने इंग्लंडला हरवून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून (India won the trophy ) केली आहे.
आयसीसीने आपल्या एका निवेदनात म्हंटले की, आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक (ICC Under-19 World Cup) स्पर्धेचे यशस्वी पद्धतीने आयोजन केल्याबद्दल वेस्ट इंडिजचे आभार मानले आहे. खेळातील भविष्यातील तारे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. 14 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकून 48 सामन्यांनंतर विजयाचा किताब प्रदान करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, यजमान चार देशांतील गयाना, सेंट किट्स अँड नेव्हिस, त्रिनिदाद, टोबॅगो-अँटिग्वा आणि बारबुडा या देशात 16 संघांसोबत स्पर्धा यशस्वीरीत्या आणि सुरक्षितपणे पार पाडली. ज्यामध्ये भारताने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले (India's record fifth title).
एलार्डिस म्हणाले, आम्ही आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वकप 2022 च्या यशस्वी आयोजनाने खुश आहोत. जागतिक महामारीच्या काळात चार देशांतील १६ संघांचे यजमानपद राखणे अत्यंत आव्हानात्मक आहे, परंतु आमच्या यजमानांनी या खेळातील भावी स्टार्सना विश्वचषकात खेळण्याची संधी देऊ शकू हे सुनिश्चित करण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे.
आम्ही क्रिकेट वेस्ट इंडिज, चार आयोजक देशांचे, खेळाडू आणि सामन्यांचे अधिकारी या सर्वांना धन्यवाद देतो. एलार्डिस म्हणाले, या व्यतिरिक्त भारतीय संघाला 2022 चे विजेतेपदासाठी धन्यवाद दिले.