मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ शनिवार पार पडला. भारतीय संघाने रविंद्र जडेजाच्या शानदार दीड शतकाच्या ( Ravindra Jadeja century ) जोरावर आपला पहिला 8 बाद 574 धावांवर घोषित केला. ज्यानंतर श्रीलंका संघाने दुसऱ्या दिवसाच्या अखेर पर्यंत 4 बाद 108 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या शानदार खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ( All-rounder Ravindra Jadeja ) शनिवारी म्हणाला, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शांत राहून सामान्यपणे फलंदाजी केली. जडेजाने 175 ही त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या बनवली. त्यानंतर भारताने 129.2 षटकात 574/8 या प्रचंड धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. जडेजा म्हणाला, "खूप छान वाटत आहे. काल ऋषभ खूप चांगला खेळत होता. तो गोलंदाजांवर हल्ला करत होता, त्यामुळे मी नॉन-स्ट्रायक एंडवर उभा राहून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत होतो."
ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्या सोबत भागीदारी केल्यानंतर बोलताना जडेजाने टिप्पणी केली, "मी फक्त माझा वेळ घेत होतो आणि मध्यभागी खूप शांत होतो, त्यामुळे ऋषभ आणि मी भागीदारी बनवण्यात यशस्वी झालो."
अश्विन आणि त्याच्या फलंदाजीबद्दल विचारले असता, जडेजा म्हणाला, "आज, मी शांत राहून सामान्यपणे फलंदाजी केली. मला नेहमी त्याच्या (अश्विन) सोबत गोलंदाजी करणे आवडते, ते सांघिक कामाबद्दल आहे. एक खेळाडू तुम्हाला सामना जिंकून देऊ शकत नाही. संपूर्ण सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे खेळपट्टीवर अधिक टर्न मिळेल आणि चेंडू देखील खालीच राहिला आहे. आम्ही विकेट दर विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करु."