ETV Bharat / sports

Indian women team in Sri Lanka tour : श्रीलंका दौऱ्यावर हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व - श्रीलंका

बुधवारी (8 जून) मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर भारताची टी-20 कर्णधार हरमनप्रीतने वनडेची धुरा सांभाळली आणि स्मृती मंधानाला उपकर्णधार ( Vice captain Smriti Mandhana ) बनवण्यात आले आहे.

Indian women team
Indian women team
author img

By

Published : Jun 9, 2022, 6:19 PM IST

मुंबई: मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर लगेच काही तासांनी, हरमनप्रीत कौरची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे कर्णधारपदी निवड करण्यात ( Harmanpreet Kaur lead Indian Team ) आली. 23 जूनपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय महिला संघ दांबुला आणि कँडी येथे अनुक्रमे तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.

बुधवारी मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Mithali Raj Announce Retirement from International ) केली, त्यानंतर भारताची टी-20 कर्णधार हरमनप्रीतने वनडेची सूत्रे हाती घेतली आणि स्मृती मंधानाला उपकर्णधार बनवण्यात आले. या यादीतून गायब असलेल्या मोठ्या नावांपैकी एक अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आहे, तर स्नेह राणा, जी या वर्षीच्या विश्वचषकात सहभागी झाली होता, तिला देखील दोन्ही संघांमधून वगळले आहे.मधल्या फळीतील फलंदाज हरलीन देओलने फक्त एक वनडे सामना खेळला आहे. तिचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर जेमिमा रॉड्रिग्सचे भारताच्या टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेनंतर जेमिमाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.

T20 क्रिकेट संघात परतणाऱ्यांपैकी एक म्हणजे राधा यादव ( Radha Yadav Comeback In T-20 Squad ) देखील आहे, जी जुलै 2021 मध्ये शेवटची खेळली होती. दुसरीकडे, सलामीवीर एस मेघनाने अलीकडेच महिला टी-20 चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझरसाठी 73 धावा केल्या आणि तिला स्थान देण्यात आले आहे. 2022 आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी झालेली गोलंदाज अष्टपैलू सिमरन बहादूरचा देखील दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारतीय महिला टी-20 संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (डब्ल्यूके), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्रेकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव.

भारतीय महिला एकदिवसीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटिया (यष्टीरक्षक) आणि हरलीन देओल.

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

  • 23 जून - पहिला टी-20 सामना, दांबुला
  • 25 जून - दुसरा टी-20 सामना, दांबुला
  • 27 जून - तिसरा टी-20 सामना, दांबुला
  • 1 जुलै - पहिला वनडे सामना, कँडी
  • 4 जुलै- दुसरा वनडे सामना, कँडी
  • 7 जुलै- तिसरा वनडे सामना, कँडी

हेही वाचा - Ranji Trophy 2022 : मुंबईने नोंदवला सर्वात मोठ्या विजयाचा विश्वविक्रम; 725 धावांनी केला उतराखंडचा पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.