ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs CSK : मुंबई आणि चेन्नईमधील सामना भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणे वाटतो - माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग - Chennai Super Kings

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग ( Former cricketer Harbhajan Singh ) हा आयपीएलचाच्या दोन्ही संघाचा भाग राहिला आहे. जेव्हा चेन्नई आणि मुंबई यांच्यात सामना होतो, तेव्हा हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना असल्यासारखा वाटतो. कारण त्यात भावना शिगेला पोहोचतात, असे भज्जीचे मत आहे.

Harbhajan Singh
Harbhajan Singh
author img

By

Published : Apr 21, 2022, 6:55 PM IST

मुंबई: पाचवेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि चार वेळचे विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जेव्हा जेव्हा आयपीएल सामना होतो, तेव्हा चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींमध्ये तो उत्साहाने भरलेला असतो. आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई आणि चेन्नई यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग ( Former India offspinner Harbhajan Singh ), जो आयपीएलमधील दोन्ही संघांचा भाग होता, त्याला वाटते की एमआय विरुद्ध सीएसके ( MI vs CSK ) सामना भारत-पाकिस्तान सामन्याची अनुभूती देतो. कारण या सामन्या दरम्यान भावना उच्च पातळीवर असतात.

इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात या दोन सर्वात यशस्वी संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) संघ सहा सामन्यातील फक्त एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नई संघापेक्षा खराब राहिली आहे. कारण मुंबई संघला आपल्या सहा सामन्यापैकी एका ही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.

हरभजन सिंग म्हणाला, 10 वर्षे (2008-17) मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये बसल्यानंतर मी पहिल्यांदा सीएसकेची जर्सी (2018 मध्ये) घातली, तेव्हा मला विचित्र वाटले. माझ्यासाठी दोन्ही संघ खूप खास आहेत. या दोन आयपीएल दिग्गजांमधील सामना भारत-पाकिस्तान स्पर्धेची अनुभूती देतो. क्रिकेटबाबत बोलताना हरभजन म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा एमआय विरुद्ध मैदानात उतरलो, तेव्हा सामना लवकर संपावा यासाठी प्रार्थना करत होतो. कारण त्या सामन्यात भावना आणि खूप दडपण होते. सुदैवाने तो सामना लवकर संपला आणि सीएसकेने जिंकला.

सूर्यकुमार यादव एमआय टीव्ही शोमध्ये ( Suryakumar Yadav On MI TV Show ) बोलताना म्हणाला, मला वाटते हे एक दशकाहून चालत आले आहे. आता लोकं एमआय आणि सीएसकेबद्दल चर्चा करत असतात. त्यामुळे मला वाटते हे नेहमीच होत असते आणि पुढेही होत राहिल. कारण जेव्हा पण दोन्ही संघ खेळतातदोन्ही संघातील बंध खुप खास असते. तसेच ब्रेव्हिसला आशा आहे की, त्याचा भाऊ लवकरच त्याच्या पालकांप्रमाणे एमआय समर्थक बनेल.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : मिल्नेच्या जागी सीएसकेमध्ये श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाला संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.