नवी दिल्ली Gambhir on Dhoni : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप सुपर ४ सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो भारताचा सहावा आणि जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, रोहित शर्मानं सलामी फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावाही पूर्ण केल्या.
गंभीरनं केलं धोनीचं कौतुक : या सामन्यादरम्यान, स्टार स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. गंभीर तसा धोनीवर टीका करण्यासाठी ओळखला जातो. त्यानं अनेकदा धोनीची कठोर शब्दात आलोचना केली आहे. यामुळे तो धोनीच्या चाहत्यांकडून ट्रोल देखील झाला आहे. यावेळी मात्र उलट घडलं. या सामन्यादरम्यान गौतम गंभीरनं चक्क धोनीचं कौतुक केलं आहे.
-
Gautam Gambhir credits MS Dhoni for Rohit Sharma's success. pic.twitter.com/Rvku3j1aFQ
— CricTracker (@Cricketracker) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gautam Gambhir credits MS Dhoni for Rohit Sharma's success. pic.twitter.com/Rvku3j1aFQ
— CricTracker (@Cricketracker) September 13, 2023Gautam Gambhir credits MS Dhoni for Rohit Sharma's success. pic.twitter.com/Rvku3j1aFQ
— CricTracker (@Cricketracker) September 13, 2023
- रोहितच्या यशाचं श्रेय धोनीला दिलं : गौतम गंभीरनं रोहित शर्माच्या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. 'रोहित शर्मा आज जो कोणी आहे, तो एमएस धोनीमुळे आहे. धोनीनं रोहितला त्याच्या सुरुवातीच्या संघर्षात सतत साथ दिली, असं गंभीर म्हणाला. रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वनडेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीरनं हे उत्तर दिलं.
-
Gautam Gambhir said, "Rohit Sharma is Rohit Sharma today because of MS Dhoni. MS backed him continuously in his initial struggling phase". pic.twitter.com/7bNleo4MGC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gautam Gambhir said, "Rohit Sharma is Rohit Sharma today because of MS Dhoni. MS backed him continuously in his initial struggling phase". pic.twitter.com/7bNleo4MGC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023Gautam Gambhir said, "Rohit Sharma is Rohit Sharma today because of MS Dhoni. MS backed him continuously in his initial struggling phase". pic.twitter.com/7bNleo4MGC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023
गंभीरनं धोनीवर अनेकदा निशाणा साधला आहे : गौतम गंभीरनं या आधी अनेकवेळा एमएस धोनीवर थेट तर कधी नाव न घेता निशाणा साधला आहे. क्रिकेट चाहते गंभीरला धोनीचा कठोर टीकाकार मानतात. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचं श्रेय एकट्या धोनीला का दिलं जातं? असा सवाल त्यानं उपस्थित केला होता. 'युवराज सिंग विश्वचषकाचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. सर्व खेळाडूंनी भारताला विश्वचषक जिंकून दिला. मग २०११ च्या वनडे विश्वचषकाचा विजय केवळ धोनीनं फायनलमध्ये मारलेल्या षटकाराच्या रुपातच का दाखवला जातो, असं गंभीर म्हणाला होता.
हेही वाचा :