मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 52 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Rajasthan Royals vs Punjab Kings ) संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य महिनाभरानंतर पुनरागमन करत असलेल्या, यशस्वी जैस्वालच्या ( Batsman Yashaswi Jaiswal ) जोरावर 19.4 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात यशस्वीने अवघ्या 41 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने यशस्वी जैस्वालबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
-
For Match 52 - @yashasvi_j is adjudged Player of the Match for his fine knock of 68 off 41 deliveries.#TATAIPL pic.twitter.com/xJPaI6eXgp
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For Match 52 - @yashasvi_j is adjudged Player of the Match for his fine knock of 68 off 41 deliveries.#TATAIPL pic.twitter.com/xJPaI6eXgp
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022For Match 52 - @yashasvi_j is adjudged Player of the Match for his fine knock of 68 off 41 deliveries.#TATAIPL pic.twitter.com/xJPaI6eXgp
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ( Former cricketer Virender Sehwag ) राजस्थान रॉयल्सचा (आरआर) युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या धुवांधार खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यशस्वी जैस्वालला काही दिवसापूर्वी संघातील आपले स्थान गमवावे लागले होते. विशेष म्हणजे त्याला आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी राजस्थान संघात रिटेन करण्यात आले होते. तरी ही त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळत आहे, हे पाहून तो दुखावला असावा, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. जेव्हा खेळाडूच्या मनाला एखादी गोष्ट लागते, तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करतो.
-
Yashasvi Jaiswal is our Top Performer from the second innings for his brilliant knock of 68 off 41 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL pic.twitter.com/TYWguLi2Ge
">Yashasvi Jaiswal is our Top Performer from the second innings for his brilliant knock of 68 off 41 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL pic.twitter.com/TYWguLi2GeYashasvi Jaiswal is our Top Performer from the second innings for his brilliant knock of 68 off 41 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL pic.twitter.com/TYWguLi2Ge
पंजाब किंग्जविरुद्धच्या ( Punjab Kings ) सामन्यात यशस्वी जैस्वालने अनेक सामन्यांनंतर पुनरागमन केले आणि त्याने जबरदस्त खेळी करत संघाला सामना जिंकून दिला. यशस्वीने अवघ्या 41 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने एका टोकापासून संघाचा डाव सांभाळून धरला होता.
-
'#YashasviJaiswal को Playing XI में वापस लाने का #RR का निर्णय बिलकुल सही'@virendersehwag और @rpsingh ने किया इस बदलाव का विश्लेषण, #CricbuzzLive हिन्दी पर#IPL2022 #PBKSvRR@kreditbee pic.twitter.com/cysqugLQIY
— Cricbuzz (@cricbuzz) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'#YashasviJaiswal को Playing XI में वापस लाने का #RR का निर्णय बिलकुल सही'@virendersehwag और @rpsingh ने किया इस बदलाव का विश्लेषण, #CricbuzzLive हिन्दी पर#IPL2022 #PBKSvRR@kreditbee pic.twitter.com/cysqugLQIY
— Cricbuzz (@cricbuzz) May 7, 2022'#YashasviJaiswal को Playing XI में वापस लाने का #RR का निर्णय बिलकुल सही'@virendersehwag और @rpsingh ने किया इस बदलाव का विश्लेषण, #CricbuzzLive हिन्दी पर#IPL2022 #PBKSvRR@kreditbee pic.twitter.com/cysqugLQIY
— Cricbuzz (@cricbuzz) May 7, 2022
यशस्वी जैस्वालच्या मनाला लागले होते - वीरेंद्र सेहवाग - क्रिकबझवरील संभाषणादरम्यान, वीरेंद्र सेहवागने यशस्वी जैस्वालच्या शानदार खेळीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''असे होते की, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाला लागते, तेव्हा तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करता. मी प्लेइंग इलेव्हनमधील स्थान कसे गमावू शकतो, असा विचार त्याने (यशस्वी) केला असेल. मला रिटेन करण्यात आले, पण तरी माझ्या जागी दुसरा कोणी खेळत आहे. जेव्हा एखादा खेळाडू अशा गोष्टीने दुःखी होतो, तेव्हा त्याच्या पुनरागमनानंतर त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करा.''
आयपीएल 2022 च्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 6 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य 19.4 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यशस्वी जैस्वालने महिनाभरानंतर पुनरागमन करत चांगली खेळी केली.