मुंबई - भारताचा माजी गोलंदाज आर. पी. सिंग याचे वडील शिवप्रसाद सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
शिवप्रसाद यांना कोरोना झाला होता आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांच्यावर लखनौच्या मेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वडिलांना कोरोना झाल्यामुळे आर. पी. सिंगने आयपीएल २०२१मधून समालोचकांच्या यादीतून आपले नाव मागे घेतले होते. दरम्यान, आर. पी. सिंगच्या आधी चेतन सकारिया, पीयूष चावला या दोघांनी देखील त्यांच्या वडिलांना गमावलं आहे.
आर. पी. सिंगने भारताकडून १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याने अनुक्रमे ४०, ६९ आणि १५ गडी बाद केले आहेत. त्याने २०११ मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह सापडलात तर.., BCCIने खेळाडूंसाठीचे नियम केले कडक
हेही वाचा - IPL २०२१ : भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत, मुंबईच्या प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट