नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्या वडीलांचे निधन (Suresh Raina father Passed Away) झाले आहे. सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे दीर्घ आजाराने निधन ( Trilokchand Raina death due to cancer) झाले. एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, ते मागील एक वर्षापासून कँसरशी झुंज देत होते. परंतु आज त्यांची झुंज अपयंशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
-
Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022
सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांच्या निधनानंतर बऱ्याच आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने देखील शोक व्यक्त करताना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी फिरकी गोलंदाज हरभजनने (Former spin bowler Harbhajan) ट्विट करताना लिहले, "सुरेश रैनाच्या वडिलांबद्दल ऐकून वाईट वाटलं. काका जी तुमच्या आत्म्याला शांती लाभो." अशा आशयाच ट्विट करत हरभजने श्रद्धांजली अर्पण केली.
सुरेश रैनाने (Former cricketer Suresh Raina)भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 226 वनडे, 78 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 5615, 1604 आणि 768 धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत एक आणि वनडेत पाच शतके लगावली आहेत.