हैदराबाद: शनिवारी (23 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील डबल हेडर सामने खेळवले गेले. यामधील दुसरा सामना म्हणजेच 36वा सामना सनराइजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद संघाने आरसीबी संघावर 9 विकेट्सने मात करत, सलग पाचवा विजय नोंदवला. सनराइजर्स हैदराबादच्या टी नटराजनने ( Bowler T Natarajan ) आपल्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यावर आता न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
-
Nattu Bhai bowled both them and us over, didn't he? 🔥🧡@Natarajan_91#RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/QGXQ5kNJud
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nattu Bhai bowled both them and us over, didn't he? 🔥🧡@Natarajan_91#RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/QGXQ5kNJud
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2022Nattu Bhai bowled both them and us over, didn't he? 🔥🧡@Natarajan_91#RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/QGXQ5kNJud
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2022
सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( SRH vs RCB ) संघात झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 16.1 षटकांत सर्वबाद 68 धावा केल्या होत्या. त्यामुळे हैदराबाद संघाला 69 धावांचे लक्ष्य मिळाले होते. याला प्रत्त्युत्तर देताना सनराइजर्स हैदराबाद संघाने 8 षटकांत 1 गडी गमावत 71 धावा करून विजय संपादन केला.
-
Stellar bowling performance from #SRH as they bundle out #RCB for just 68
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
3 wickets for Jansen and 3 for T Natarajan who ended up with figures of 3/10 and he is our top performer for his economical bowling figures!
Follow the match: https://t.co/f9ENkwNWAn#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/UViVjaCFGi
">Stellar bowling performance from #SRH as they bundle out #RCB for just 68
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
3 wickets for Jansen and 3 for T Natarajan who ended up with figures of 3/10 and he is our top performer for his economical bowling figures!
Follow the match: https://t.co/f9ENkwNWAn#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/UViVjaCFGiStellar bowling performance from #SRH as they bundle out #RCB for just 68
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
3 wickets for Jansen and 3 for T Natarajan who ended up with figures of 3/10 and he is our top performer for his economical bowling figures!
Follow the match: https://t.co/f9ENkwNWAn#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/UViVjaCFGi
न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी ( Former spinner Daniel Vettori ) याने वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या संभाव्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिटोरीच्या म्हणण्यानुसार, टी नटराजनच्या आयपीएल 2022 मधील जबरदस्त कामगिरीनंतर संघात सामील होण्याची शक्यता वाढली आहे. टी नटराजनबद्दल बोलायचे तर आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. त्याने आतापर्यंत सात सामन्यांत 14.53 च्या सरासरीने 15 बळी घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 8.07 राहिला आहे.
टी नटराजन डेथ ओव्हर्समध्ये सर्वोत्तम गोलंदाज - ईएसपीएन क्रिकइन्फोसोबतच्या संभाषणादरम्यान, डॅनियल व्हिटोरीला टी नटराजन संघात परतण्याच्या शक्यतेबद्दल विचारले गेले. या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, टी नटराजनकडे हे कौशल्य आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ते खूप चांगले आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे सोपे नाही, पण टी नटराजन सातत्याने डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आहे. या काळात नटराजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला होता. हे आपल्याला माहित आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार नसली तरी 15 सदस्यीय संघात त्याचा समावेश नक्कीच होऊ शकतो. त्यांच्या निवडीनंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडकडे बरेच पर्याय असतील.
नटराजन ज्याप्रकारे अचूक यॉर्कर टाकतो, त्यामुळे फलंदाजांना ते खेळणे कठीण होऊन बसते. सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. इतकंच नाही तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटी सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या भारतीय संघात पुनरागमनाची चर्चा रंगली आहे.