ओवल - भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने बिनबाद 77 धावा केल्या आहेत. त्यांना अखेरच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 291 धावा करायच्या आहेत. हमीद 43, तर बर्न्स 31 धावांवर खेळत आहेत.
दुसऱ्या डावात रोहित शर्माने 127 आणि के एल राहुलने 46 धावा करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने 61 धावा करताना रोहितला चांगली साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले. परंतु त्याने 44 धावांचे मोलाचे योगदान दिले. चौथ्या दिवशी रिषभ पंत (50) व शार्दूल ठाकूर (60) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
हसीब हमीद व रोरी बर्न्स या इंग्लंडच्या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्या खेळपट्टीवर इंग्लंड ही कमाल करणारा का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शार्दुल ठाकूर-ऋषभ पंतची भागिदारी
शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत या जोडीने इंग्लंड गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 4.5 च्या सरासरीने धावा केल्या. या दोघांनी सातव्या शतकी भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी आघाडी घेतला आली.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय जेम्स अँडरसन आणि जो रूटला प्रत्येकी 1-1 गडी बाद करता आला.
हेही वाचा - ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह 4 जण विलगीकरणात
हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर