ETV Bharat / sports

संजय मांजरेकरांचे रहाणेच्या खराब फॉर्मविषयी ट्विट, म्हणाले... - संजय मांजरेकर लेटेस्ट न्यूज

चेन्नई कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट दोन्ही डावांमध्ये एकदम शांत होती. पहिल्या डावात तो केवळ १ धाव करुन बाद झाला. तर, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला खातेही उघडू दिले नाही. या कामगिरीनंतर माजी भारतीय खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मांजरेकरांचे रहाणेच्या खराब फॉर्मविषयी ट्विट

author img

By

Published : Feb 10, 2021, 8:45 AM IST

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत खेळलेला पहिला सामना पाहुण्या संघाने २२७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून ४२० धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करत दुसऱ्या डावात फक्त १९२ धावा केल्या. या डावात विराट आणि शुबमन वगळता सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.

चेन्नई कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट दोन्ही डावांमध्ये एकदम शांत होती. पहिल्या डावात तो केवळ १ धाव करुन बाद झाला. तर, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला खातेही उघडू दिले नाही. या कामगिरीनंतर माजी भारतीय खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मांजरेकर यांनी ट्विटरवर लिहिले की, “माझी समस्या कर्णधार रहाणे ते फलंदाज रहाणे अशी आहे. २७*, २२, ४, ३७, २४, १, ० ही मेलबर्नमधील शतकानंतर रहाणेची धावसंख्या आहे. शतकानंतर दर्जेदार खेळाडू आपला फॉर्म पुढे नेतात आणि फॉर्म नसलेल्या खेळाडूंचे वजन उचलतात.''

  • My issue with Rahane the captain is Rahane the batsman.
    After that 100 in Melbourne his scores are - 27*, 22, 4, 37, 24, 1 & 0. After a 100, class players carry their form & carry the burden of players out of form. #INDvENG

    — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर रहाणेला फलंदाजीत अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २-१ने जिंकली. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारत जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - उत्तराखंडला मोठा धक्का..! मुख्य प्रशिक्षक वसिम जाफरने दिला राजीनामा

चेन्नईत पाहुण्यांचा मोठा विजय -

इंग्लंडने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. यात इंग्लंड संघाला मोठी आघाडी मिळाली त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.