ETV Bharat / sports

''बायोबबल तोड आणि...'', मालिकाविजयानंतर अश्विनच्या बायकोची प्रतिक्रिया

author img

By

Published : Mar 7, 2021, 9:30 AM IST

प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले, ''आता बायो बबल तोड आणि घरी ये.'' शेवटच्या कसोटीत पाहुण्या संघाच्या दुसर्‍या डावात अश्विनने दोन बळी घेतले. भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी सामना जिंकला. अश्विनने सामन्यात ८ गडी बाद केले. अश्विनने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले.

Ravichandran Ashwin latest news
Ravichandran Ashwin's wife Prithi

अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यात भारतीय ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली. ही मालिका भारताने ३-१ने जिंकली. या विजयानंतर अश्विनची पत्नी प्रीती अश्विनने ट्विटरवरून आपल्या पतीसाठी खास ट्विट केले आहे. मालिकावीराचा मान पटकावलेल्या अश्विनने लवकरात लवकर घरी यावे, असे प्रीतीने म्हटले आहे.

प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले, ''आता बायो बबल तोड आणि घरी ये.'' शेवटच्या कसोटीत पाहुण्या संघाच्या दुसर्‍या डावात अश्विनने दोन बळी घेतले. भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी सामना जिंकला. अश्विनने सामन्यात ८ गडी बाद केले. अश्विनने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले.

इतकेच नव्हे तर, चार सामन्यांच्या या मालिकेत त्याने एकूण ३२ बळी मिळवले. या व्यतिरिक्त तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू देखील ठरला. या मालिकेत त्याने सहा डावांमध्ये एकूण १८९ धावा केल्या. रोहित शर्मा आणि रिषभ पंत व्यतिरिक्त त्याने भारतासाठी एक शतक ठोकले. या कामगिरीमुळे अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा - भारताचा मोठा पराक्रम, नोंदवला सलग १३वा कसोटी मालिकाविजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.