ETV Bharat / sports

खुशखबर..! भारत-इंग्लंड कसोटी सामन्याची आजपासून मिळणार तिकिटे

आज सोमवारी म्हणजेच ८ फेब्रुवारीला सकाळी दहापासून नागरिकांना पेटीएम अ‍ॅप, इनसाइडर डॉट कॉम आणि पेटीएम डॉट कॉमवर तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. दैनंदिन तिकिटांचे दर १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान ठेवले आहेत.

India vs England Tickets
India vs England Tickets
author img

By

Published : Feb 8, 2021, 7:10 AM IST

चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या दुसर्‍या कसोटी सामन्यातील तिकिटे केवळ ऑनलाइन विकली जाणार आहेत. उभय संघातील हा सामना १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने आधीच जाहीर केले होते की, दुसऱ्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल.

हेही वाचा - भारताचे महान माजी टेनिसपटू अख्तर अली यांचे निधन

आज सोमवारी म्हणजेच ८ फेब्रुवारीला सकाळी दहापासून नागरिकांना पेटीएम अ‍ॅप, इनसाइडर डॉट कॉम आणि पेटीएम डॉट कॉमवर तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. दैनंदिन तिकिटांचे दर १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान ठेवले आहेत.

१५,००० प्रेक्षक घेऊ शकतील सामन्याचा आनंद

चेपॉक स्टेडियमवरील ३ स्टँड हे २०१२ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी खुले होणार आहे. या ३ स्टँडवर वेगवेगळ्या कारणांमुळे बंदी घालण्यात आली होती. २०११ च्या वर्ल्डकपनंतर हे तीनही स्टँड प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आले होते. या तीन स्टँड मध्ये अधिकतम १५,००० प्रेक्षक ( प्रत्येकी चार हजार) सामना पाहू शकतात. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आरएस रामसानी यांनी सांगितले की, १५,००० तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

दुसर्‍या कसोटीनंतर दोन्ही संघ अहमदाबादला जाणार आहेत. दोन्ही संघात सरदार पटेल स्टेडियमवर कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळले जातील. २४-२८ फेब्रुवारी दरम्यान होणारा तिसरा सामना डे-नाईट असेल तर ४ ते ८ मार्च दरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.