चेन्नई - चेपॉक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात कालपासून (५ फेब्रुवारी) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहायला मिळाले. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लंड संघाने ३ बाद २६३ अशी मजल मारली. कर्णधार जो रूटने दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान रूटच्या पायाला 'क्रॅम्प्स' आले आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्याकडे धाव घेतली.
हेही वाचा - स्टार्कसोबत इंग्लंडचा 'हा' दिग्गज फलंदाज असणार आयपीएलबाहेर!
सामन्याच्या ८७व्या षटकात फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रूटने षटकार खेचला. यानंतर तो 'क्रॅम्प्स'च्या वेदनेमुळे जमिनीवर कोसळला. इंग्लंडचा फिजिओ रूटकडे येईपर्यंत विराट त्याच्याजवळ पोहोचला. विराटने रूटचे पाय 'मोकळे' केले. यामुळे रूटला थोडा दिलासा मिळाला. विराटने दाखवलेल्या खेळभावनेबद्दल त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. बीसीसीआयनेही त्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
-
#SpiritOfCricket at its very best 😊😊#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SpiritOfCricket at its very best 😊😊#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021#SpiritOfCricket at its very best 😊😊#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021
विशेष म्हणजे रूटचा हा १००वा कसोटी सामना आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रूट १४ चौकार आणि एका षटकारासह १२८ धावांवर नाबाद होता. आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रूट हा जगातील नववा तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे.
रूटचे हे सलग तिसरे शतक आहे. रूट आपल्या ९८व्या, ९९व्या आणि १००व्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे. यापूर्वी त्याने श्रीलंका दौर्यावर दोन शतके ठोकली होती.