ETV Bharat / sports

PAK vs ENG 5th T20 : पाचव्या टी-20 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; 'हा' गोलंदाज झाला बाहेर - क्रिकेटच्या मराठी न्यूज

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याला गंभीर विषाणू संसर्गामुळे रुग्णालयात दाखल ( Naseem Shah Admitted to Hospital ) करण्यात आले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो खेळू शकणार ( Naseem Shah ruled out of the fifth match ) नाही.

PAK vs ENG
PAK vs ENG
author img

By

Published : Sep 28, 2022, 5:12 PM IST

लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंड संघात सात सामन्यांची टी-20 मालिका ( PAK vs ENG T20 Series ) खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना गद्दाफी स्टेडियम लाहोर येथे खेळला जाणार आहे. तसेच या सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याला गंभीर विषाणू संसर्गामुळे रुग्णालयात दाखल ( Naseem Shah Admitted to Hospital ) करण्यात आले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो खेळू शकणार ( Naseem Shah ruled out of the fifth match ) नाही.

पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ( PAK vs ENG 5th T20 ) नसीमचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान जवळपास निश्चित झाले होते. परंतु मंगळवारी रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने या खेळाडूला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याला बरे वाटत असले, तरी सात सामन्यांच्या मालिकेतील त्याच्या उर्वरित सामन्यांतील सहभाग संशयाच्या भोवऱ्यात आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) एका निवेदनात म्हटले आहे की, त्याला व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु आता त्याला बरे वाटत आहे. निवेदनानुसार तो आज रात्रीच्या सामन्यात खेळणार नाही. तसेच उर्वरित सामना खेळण्याबाबत कोणताही निर्णय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल.

संघाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, त्याची डेंग्यूची चाचणीही करण्यात आली आहे आणि त्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या एक महिन्यापासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच दररोज हजारो लोक त्याला बळी पडत आहेत.

नसीमने मालिकेतील सलामीचा सामना खेळला होता, मात्र त्यानंतर तीन सामन्यांत तो प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. हा 21 वर्षीय गोलंदाज पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक संघाचाही ( T20 World Cup Pak Squad ) एक भाग आहे. कराचीमध्ये चार सामने खेळल्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ उर्वरित तीन सामन्यांसाठी लाहोरला पोहोचले आहेत. दोन्ही संघातील ही मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे.

हेही वाचा - IND A vs NZ A ODI Series : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारत 'अ'चा न्यूझीलंड 'अ' संघाला व्हाईट वॉश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.