ETV Bharat / sports

ENG vs IND 5th Test : नाणेफेक जिंकून इंग्लडचा गोलंदाजीचा निर्णय, भारत प्रथम फलंदाजीसाठी सज्ज

author img

By

Published : Jul 1, 2022, 3:02 PM IST

इंग्लंड आणि भारत ( ENG vs IND ) संघात आज पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ENG vs IND 5th Test
ENG vs IND 5th Test

बर्मिंगहॅम: इंग्लंड आणि भारत यांच्यात शुक्रवारपासून पाचवा कसोटी सामना ( ENG vs IND 5th Test ) खेळवला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार जसप्रीत बुमराह आणि बेन स्टोक्स यांच्यात नाणेफेक पार पडली. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( England opt to bowl ) आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. हा शेवटचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राहून मालिका जिंकण्याचा त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न असेल.

शेवटच्या दौऱ्यात हा सामना पुढे ढकलण्यात आला होता, जो नंतर 1 ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली उतरेल. जसप्रीत माजी खेळाडू कपिल देव यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (कर्णधार).

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): अॅलेक्स लीस, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅटी पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.

हेही वाचा - Javelin Thrower Neeraj Chopra : नीरज चोप्राने मोडला राष्ट्रीय विक्रम, 89.94 मीटर भाला फेकत जिंकले रौप्य पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.