ETV Bharat / sports

ENG vs IND : इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडिया अवघ्या 78 धावांत गारद - ओली रॉबिन्सन

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) या दोघांना वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

ENG vs IND, 3rd Test: India bundled out for 78 on day 1
ENG vs IND : इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडिया अवघ्या 78 धावांत गारद
author img

By

Published : Aug 25, 2021, 8:00 PM IST

Updated : Aug 25, 2021, 8:20 PM IST

हेडिंग्ले - लॉर्ड्स कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला खरा. पण इंग्लंड गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय धुरंदरांनी अक्षरशः लोटांगण घातलं. इंग्लंडच्या माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) या दोघांना वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, क्रेग ओवरटन आणि सॅम कुरेन या गोलंदाजांनी भारताच्या डावाला खिंडार पाडले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर केएल राहुल पहिल्याच षटकात माघारी परतला. जेम्स अँडरसनने त्याला बाद केले. त्यानंतर त्यानं आणखी दोन फलंदाजांना बाद करत भारताची अवस्था 3 बाद 21 अशी केली. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म या सामन्यात देखील कायम राहिला. अवघी एक धाव करून पुजारा यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली 7 धावा काढून बाद झाला.

जेम्स अँडरसनच्या तडाख्यानंतर ऑली रॉबिन्ससन याने भारताच्या दोन शिलेदारांना माघारी पाठवले. त्याने अजिंक्य रहाणे (18) आणि ऋषभ पंत (2) यांना बाद केले. अशात रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करून खिंड लढवत होता. त्याला ओवरटन याने बाद केले. रोहित 105 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. ओवरटन यानेच रोहित पाठोपाठ मोहम्मद शमीला देखील आल्या पावले माघारी पाठवले. तेव्हा भारताची अवस्था 7 बाद 67 अशी झाली.

जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सनच्या सॅम कुरेनने भारतीय संघावर तोफ डागली. त्याने एका षटकात सलग दोन धक्के दिले. रविंद्र जडेजा (4) आणि जसप्रीत बुमराह (0) यांची त्याने शिकार केली. यानंतर ओवरटन याने सिराजला (3) बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

हेही वाचा - भारतीय महिला संघासाठी वाईट बातमी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या कारण

हेही वाचा - ENG vs IND: जेम्स अँडरसनने पुन्हा केली विराट कोहलीची शिकार, सर्वाधिक वेळा केलं बाद

Last Updated : Aug 25, 2021, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.