मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने गुरुवारी भारतीय संघाची घोषणा ( India Announce Squads for T20 and ODI ) केली. पाचव्या कसोटीचा शेवटचा दिवस आणि T20I मालिकेची सुरुवात यामधील कमी वेळ लक्षात घेऊन, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 20 षटकांच्या तीन सामन्यांसाठी दोन भिन्न संघ निवडले आहेत.
रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. साउथहॅम्प्टन येथे 7 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करण्यासाठी संघात पुन्हा दाखल होईल.
-
NEWS 🚨 - #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
— BCCI (@BCCI) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details 👇 #ENGvIND https://t.co/ii121ge0jY
">NEWS 🚨 - #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
— BCCI (@BCCI) June 30, 2022
More details 👇 #ENGvIND https://t.co/ii121ge0jYNEWS 🚨 - #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
— BCCI (@BCCI) June 30, 2022
More details 👇 #ENGvIND https://t.co/ii121ge0jY
पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, व्यंकटेश अय्यर आणि रुतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी या चौघांना संधी देण्यात आली नाही. त्यांच्या जागी विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी संधी देण्यात आली आहे.
पहिल्या T20 साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि उमरान मलिक.
3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
हेही वाचा - INTERVIEW: ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याचे दडपण जाणवले नाही; डायमंड लीगच्या कामगिरीवर नीरज चोप्रा म्हणाला