ETV Bharat / sports

Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jul 6, 2021, 2:38 PM IST

Updated : Jul 6, 2021, 3:00 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला सुरूवात होण्याआधीच इंग्लंड क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) याची माहिती दिली.

ecb-confirm-that-seven-members-of-the-england-odi-team-tested-positive-for-covid-19
Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण

लंडन - पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला सुरूवात होण्याआधीच इंग्लंड क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) याची माहिती दिली.

ईसीबीने सांगितले की, इंग्लंड एकदिवसीय संघातील ३ खेळाडू आणि ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत एकदिवसीय संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे.

...तरीही उभय संघातील मालिका होणार

इंग्लंड क्रिकेट बोर्ड लवकरच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा करणार आहे. ईसीबीने उभय संघातील मालिका होणार असल्याचे जाहीर केले आहे. बेन स्टोक्स इंग्लंड संघात पुनरागमन करणार आहे आणि तो संघाचे नेतृत्व देखील करणार आहे.

कोरोना बाधित खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका होणार आहे. नुकतीच इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली आहे. या दोन्ही मालिकेत इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव केला होता.

इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करणे एक आव्हान आहे. पाकिस्तान संघाला विश्वविजेता इंग्लंड संघाला पराभूत करणे सोप होणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या मालिकेसाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे.

असा आहे पाकिस्तानचा संघ -

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहिम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हारिस सोहेल, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सऊद शकील, शाहिन शाह अफरीदी आणि उस्मान कादिर.

हेही वाचा - IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?

हेही वाचा - India vs Sri Lanka मालिका सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूचे निलंबन, सोबत झाला लाखोंचा दंड

Last Updated : Jul 6, 2021, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.