पोर्ट ऑफ स्पेन: आयसीसी अंडर-19 विश्वकप स्पर्धेतील आयर्लंड आणि झिम्बाब्वे (Ireland vs Zimbabwe) यांच्यातील सामन्या दरम्यान एक घटना घडली आहे. हा सामना सुरु असताना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्याचा परिणाम सामन्याचे प्रसारण केले जाणाऱ्या दृश्यांवर झालेला दिसून आला. जे स्पष्टपणे भूकंपाचे धक्के बसत असलेले दिसत होते. परंतु मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूंना माहित झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपले खेळणे सुरुच ठेवले. परंतु समालोचन कक्षात समालोचकांना हे धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केलवर इतकी नोंदवण्यात आली. समालोचक अँड्र्यू लिओनार्ड यांनी भूकंपाचे वर्णन केले आणि सांगितले की कॉमेंट्री बॉक्स हादरत होता. ते म्हणाले, मला वाटत होते की, आता भूकंप येत आहे. वास्तवात भूकंप येत आहे. असे जाणवत होते की आमच्या पाठीमागून रेल्वे जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण क्वींस पार्क ओवल मीडिया सेंटर हादरले (Queen's Park Oval Media Center shook) आहे. या भूकंपाचे हादरे 15 ते 20 सेकंद पर्यंत जाणवले.
आयर्लंडचा फिरकीपटू मॅथ्यू हम्फ्रीज (Ireland spinner Matthew Humphries) झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटला 6 वे षटकातील पाचवा चेंडू टाकत होता. त्यावेळेस भूकंपामुळे कॅमेरा हलू लागला. या दरम्यानच्या दृश्यात हे स्पष्ट दिसत होते. परंतु सामना थांबला नाही. बेनेटने मिड ऑफच्या दिशेने रक्षात्मक शॉट खेळला, त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. लूप न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगोजवळ शनिवारी सकाळी ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. यूडब्ल्यूआय भूकंप संशोधन केंद्राच्या म्हणण्यानुसार, भूकंप सकाळी 9:40 वाजता झाला.