मुंबई - देशात १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू देखील लस टोचून घेताना दिसून येत आहेत. काही तासांपूर्वी दिनेश कार्तिकने देखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. या फोटोजवरून ख्रिस लीनने त्याला ट्रोल केले आहे.
दिनेश कार्तिकने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून लस टोचून घेतानाचा फोटो शेअर करत म्हटलं की, मी लस टोचून घेतली आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लीनने या फोटोवरून दिनेश कार्तिकला ट्रोल केलं आहे. त्याने, कमीत कमी पँट तरी घालायची, या शब्दात कार्तिकला ट्रोल केलं आहे.
-
Could have at least worn pants
— Chris Lynn (@lynny50) May 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Could have at least worn pants
— Chris Lynn (@lynny50) May 11, 2021Could have at least worn pants
— Chris Lynn (@lynny50) May 11, 2021
कार्तिकने जॉगर पँट घातली होती. लीनच्या ट्विटला कार्तिकने देखील उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, 'मी देखील तुझ्यासारखी शॉर्ट्स घालण्याचा विचार करत होतो. परंतु नंतर मला आठवले की, मी मालदीवमध्ये नाहीये. त्यामुळे मी हे घातलं.'
दरम्यान, कार्तिक आणि लीन हे दोघेही कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये एकत्र खेळले आहेत. त्यामुळे ते अनेकदा मस्ती करताना दिसून आले आहेत.
या क्रिकेटपटूंनी घेतली लस -
आतापर्यंत शिखर धवन, विराट कोहली, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, दिनेश कार्तिक आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधाना या खेळाडूंनी लस टोचून घेतली आहे.
हेही वाचा - भारताविरुद्धच्या WTC फायनलनंतर निवृत्ती घेणार 'हा' दिग्गज खेळाडू
हेही वाचा - सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद