ETV Bharat / sports

Cricketer Mahendra Singh Dhoni : धोनीकडून होळीनिमित्त खास भेट ; 19 मार्चपर्यंत पाहता येणार धोनीचा 'हा' फार्म - dhoni HOLI

रांचीचा राजकुमार धोनीने होळीच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक सरप्राईज गिफ्ट दिले ( Dhoni presents Holi to fans ) आहे. धोनीने साम्बो येथील त्याचे फार्म हाऊस 19 मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे.

ms dhoni
ms dhoni
author img

By

Published : Mar 18, 2022, 12:06 PM IST

रांची: भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीने ( Captain Kool Mahendra Singh Dhoni ) होळीच्या निमित्ताने आपल्या शहर वासियांना एक अनोखे सरप्राइज गिफ्ट दिले आहे. धोनी हा रांची शहरातून येतो. रांचीच्या वासियांना त्यांनी 19 मार्चपर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत त्यांच्या फार्महाऊसचे दरवाजे उघडले ( Dhoni's farmhouse opened for fans ) आहेत. यादरम्यान, साम्बोमध्ये महेंद्रसिंग धोनीचा EEZA फार्म पाहता येईल. त्याचबरोबर शिस्तबद्ध पध्दतीने होळीही खेळता येणार आहे. त्यामुळे सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

धोनीचे साम्बो येथील फार्म हाऊस

रसदार स्ट्रॉबेरीचा सुद्धा घेता येणार स्वाद -

धोनीच्या इझा फॉर्ममध्ये सेंद्रिय पद्धतीने भाज्यांची लागवड ( Dhoni's organic farming ) केली जाते. सध्या येथे स्ट्रॉबेरीसोबतच सिमला मिरची, वाटाणा आणि बीन्सची लागवड केली आहे. भेट म्हणून, यावेळी रांचीच्या रहिवाशांना 250 ग्रॅम स्ट्रॉबेरीचे पॅकेट ₹ 50 मध्ये दिले जात आहे. धोनीचे हे फार्म 43 एकरात पसरले आहे. येथे हंगामानुसार भाजीपाला पिकवला जातो. महेंद्रसिंग धोनीने येथे एक डेअरी फार्मही उघडला आहे. येथील दूध रांचीमधील अनेक काउंटरवर विकले जाते. गतवर्षी उन्हाळी हंगामातही येथे टरबूजाची लागवड करण्यात आली होती.

खरं तर, महेंद्रसिंग धोनी जेव्हाही रांचीला येतो, तेव्हा तो वेळ काढून नक्कीच त्याच्या फार्महाऊसवर जातो. तो इथल्या कामगारांसोबत शेती करताना, कधी ट्रॅक्टर चालवताना तर कधी झाडं लावताना दिसतो, त्याची पत्नी साक्षी त्याचे फोटो पोस्ट करत असते. धोनीने त्याच्या फॉर्मला EEZA म्हणजेच आई असे नाव दिले आहे. सध्या कृषी सल्लागार रोशन यांच्या ( Dhoni's agricultural advisor ) मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारेच येथे शेती केली जाते. रोशनने सांगितले की, जेव्हा जेव्हा महेंद्रसिंग धोनी येथे येतो, तेव्हा तो स्वतः यामध्ये रस घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.