ETV Bharat / sports

DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सला जबर धक्का; अष्टपैलू खेळाडूला दुखापत

दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याला दुखापत झाली आहे. यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मार्कस स्टॉयनिसचे मासंपेसी ताणले गेले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग स्टॉयनिसच्या रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.

delhi-capitals-all-rounder-marcus-stoinis-injured
DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सला जबर धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत
author img

By

Published : Sep 23, 2021, 3:09 PM IST

दुबई - दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्रात दमदार सुरूवात केली. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 8 गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. पण यादरम्यान, दिल्लीला एक धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याला दुखापत झाली आहे. यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मार्कस स्टॉयनिसचे मांसपेशी ताणले गेले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग स्टॉयनिसच्या रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.

सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिस दुसरे षटक फेकण्यासाठी आला. तेव्हा त्याचे मांसपेशी ताणले गेले. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने या सामन्यात फक्त सात चेंडू फेकले.

मार्कस स्टॉयनिस दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाची देखील डोकेदुखी वाढली आहे. कारण स्टॉयनिसची निवड टी-20 विश्वकरडंक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आली आहे आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा खेळाडू आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि ऑस्ट्रेलियाचा संघ, मार्कस स्टॉयनिस दुखापतीतून लवकर सावरला पाहिजे, यासाठी प्रार्थना करत असतील. दरम्यान, अद्याप मार्कस स्टॉयनिसच्या दुखापत किती गंभीर आहे. याचे अपडेट समोर आलेले नाहीत.

दिल्ली कॅपिटल्सने असा जिंकला सामना

आयपीएल 2021 च्या 33व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत दिल्लीचा संघाने 14 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या संघाने दिल्लीला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने 17.5 षटकांत केवळ दोन गडी गमावून 139 धावा पूर्ण केल्या. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने 37 चेंडूत 42 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर 41 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंतने 21 चेंडून 3 षटकार व 2 चौकाराच्या मदतीने 35 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा - IPL 2021 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला झाली शिक्षा, कारण...

हेही वाचा - IPL 2021 : हैदराबादवर आठ गडी राखत दिल्लीचा विजय, गुणतालिकेत दिल्ली अव्वल स्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.