लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यात 3-0 असा क्लीन स्वीप केले. मात्र, या मालिकेतील अंतिम सामना मोठ्या वादात सापडला. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा 'मंकाडिंग'मुळे चर्चेत ( Deepti Sharma Mankading controversy ) आली. तिने सामन्याच्या शेवटी इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला नॉन स्ट्रायकरच्या चेंडूवर धावबाद ( Charlie Dean runs out on non striker ) केले. याची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांनी हे खेळ भावनेच्या विरोधात म्हंटले आहे, तर काहींनी नियमांनुसार असल्याचे म्हंटले आहे. मात्र, दीप्तीने आता या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे.
-
Dear @ICC Either make #mankading illegal or else make it completely legal. I don’t understand till today that if this is the rule then why is it against the spirit of the game? Every team must use it. @ashwinravi99 am I correct?
— Natasha🇨🇦 🇮🇳 (@Natasha_90_) September 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#ENGvsIND #DeeptiSharma #JhulanGoswami𓃵 pic.twitter.com/H5fUl1HKH1
">Dear @ICC Either make #mankading illegal or else make it completely legal. I don’t understand till today that if this is the rule then why is it against the spirit of the game? Every team must use it. @ashwinravi99 am I correct?
— Natasha🇨🇦 🇮🇳 (@Natasha_90_) September 24, 2022
#ENGvsIND #DeeptiSharma #JhulanGoswami𓃵 pic.twitter.com/H5fUl1HKH1Dear @ICC Either make #mankading illegal or else make it completely legal. I don’t understand till today that if this is the rule then why is it against the spirit of the game? Every team must use it. @ashwinravi99 am I correct?
— Natasha🇨🇦 🇮🇳 (@Natasha_90_) September 24, 2022
#ENGvsIND #DeeptiSharma #JhulanGoswami𓃵 pic.twitter.com/H5fUl1HKH1
अष्टपैलू दीप्ती शर्माने ( Deepti Sharma Break the Silence ) भारतात पोहोचल्यानंतर सांगितले की, नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर उभा असलेली डीन वारंवार क्रीज सोडत असल्याने हा योजनेचा एक भाग होता. “आम्ही तिला आधी चेतावणी दिल्याप्रमाणे हा आमच्या योजनेचा एक भाग होता, पण ती पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत होती. आम्ही जे काही केले ते नियमानुसार होते. आम्ही पंचांनाही याबाबत सांगितले होते.
भारताने हा सामना 16 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. मॅचच्या 44व्या ओव्हरमध्ये जेव्हा दीप्ती बॉलिंग करत होती, तेव्हा कॅप्टन हरमनप्रीत कौरने चार्ली डीनला मंकडिंग करण्याचा इशारा ( Warning from Captain Harmanpreet Kaur ) दिला आणि दीप्तीने डीनला मंकडिंग केले. डीनने 80 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. अशा प्रकारे बाद झाल्यानंतर ती खूपच निराश दिसली आणि मैदानावरच तिचे डोळे ओले झाले. त्यानंतर भारताने त्यांची स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला निरोप दिला, जिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
हेही वाचा - Ind Vs Aus T20 Series : विराट सूर्याचे कौतुक करताना रोहितने 'या' दोन खेळाडूंचा केला वचाव, म्हणाला....!