ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : दीपक चहर पाठोपाठ केकेआरचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर - ग्लेन मॅक्सवेल

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar Injured ) दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर केकेआरचा देखील एक गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Deepak Chahar & Harshit Rana
Deepak Chahar & Harshit Rana
author img

By

Published : Apr 15, 2022, 8:47 PM IST

हैदराबाद: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, चार वेळचा चॅम्पियन चेन्नई संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर ( Fast bowler Deepak Chahar ) दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा वेगवान गोलंदाज रसिक सलाम दुखापतीमुळे मोसमातील पुढील सामने खेळू शकणार नाही.

दीपक चहरला मेगा लिलावात सीएसके फ्रँचायझीने तब्बल 14 कोटी रुपयांची बोली लावत संघात समावेश केला होता. दीपक या मोसमात एकही सामना खेळू शकला नाही. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचाही मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज रसिक ( Rasik Salam ) सलाम दुखापतीमुळे मोसमातील पुढील सामने खेळू शकणार नाही. सलामच्या जागी केकेआरने हर्षित राणाला बदली म्हणून ( Harshit Rana Joins KKR ) निवडले आहे. चहर गेल्या अनेक वर्षांपासून सीएसकेचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील आयपीएलमधील समतोल आधीच प्रभावित झाला आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी ( National Cricket Academy ) येथे नुकत्याच झालेल्या पुनर्वसनाच्या वेळी चहरला दुखापत झाली.

सध्या तरी दुखापतीची तीव्रता कळू शकलेली नाही. कारण असे कळते की सीएसकेला अद्याप बीसीसीआयकडून औपचारिक अहवाल मिळालेला नाही. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या T20I मालिकेदरम्यान 29 वर्षीय खेळाडूला दुखापत झाली होती. आयपीएलच्या नियमांनुसार, खेळाडूच्या लिलावाच्या रकमेला त्याचे वेतन म्हटले जाते आणि त्यानुसार करही कापला जातो. ही संपूर्ण रक्कम खेळाडूच्या खात्यात जाते.

लिलावाची रक्कम एक वर्षासाठी असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूला 14 कोटी रुपयांना खरेदी केले असेल, तर त्याला दरवर्षी ही रक्कम मिळेल आणि त्याला तीन वर्षांसाठी 42 कोटी रुपये दिले जातील. जर एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहिला, तर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. तसेच त्यामध्ये तो किती सामने खेळतो याने काही फरक पडत नाही.

विशेष म्हणजे 2013 साली ऑस्ट्रेलियन मर्यादित षटकांचा स्पेशलिस्ट ग्लेन मॅक्सवेलला ( Glenn Maxwell ) मुंबई इंडियन्सने सुमारे 6 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो केवळ तीन सामने खेळला, तरी त्याला पूर्ण मोबदला मिळाला. पण हंगाम सुरू होण्यापूर्वी एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रेंचायझी त्याला कोणतीही रक्कम देत नाही. अहवालानुसार, जर एखादा खेळाडू एका हंगामात ठराविक सामन्यांसाठी उपलब्ध असेल, तर सामान्यतः एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम दिली जाते. जर एखाद्या खेळाडूने संघाच्या शिबिरासाठी हजर राहिला आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याला दुखापत झाली आणि पुढील सामन्यांमध्ये त्याने भाग घेतला नाही, तरीही त्याला लिलावाच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळते. तसेच स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रँचायझी त्याच्या उपचाराचा खर्च उचलते.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोरोनाचा शिरकाव; दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' सदस्याला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.