मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये काल शनिवार 14 वा सामना खेळला गेला. गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा हा रंगतदार सामना होता. स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स मैदानात उतरली होती. तर मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स खेळत होती. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर काल सामना खोळवला गेला. ज्यात शफाली वर्माने तिचे अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 7.1 षटकांत दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचे 105 धावांचे आव्हान पूर्ण केले. त्याशिवाय 10 खेळाडू राखून त्यांनी हा सामना जिंकला.
-
🚨 Team Updates 🚨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Laura Wolvaardt & Georgia Wareham are in for @GujaratGiants while Laura Harris is in for the @DelhiCapitals
Follow the match 👉 https://t.co/ea9cEEkMGR#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/9KNlGPpASC
">🚨 Team Updates 🚨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2023
Laura Wolvaardt & Georgia Wareham are in for @GujaratGiants while Laura Harris is in for the @DelhiCapitals
Follow the match 👉 https://t.co/ea9cEEkMGR#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/9KNlGPpASC🚨 Team Updates 🚨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2023
Laura Wolvaardt & Georgia Wareham are in for @GujaratGiants while Laura Harris is in for the @DelhiCapitals
Follow the match 👉 https://t.co/ea9cEEkMGR#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/9KNlGPpASC
शफाली वर्माचे दुसरे अर्धशतक : शफाली वर्माने 19 चेंडूत अर्धशतक केले. दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. मॅरिझान कॅपने 15 धावांत 5 बाद 5 अशी सनसनाटी कामगिरी केली, तर शिखा पांडेने 3/26 असा दावा केला कारण दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला नऊ बाद 105 धावांवर रोखले. 106 धावांचा पाठलाग करताना, शफालीने 28 चेंडूत10 चौकार, पाच सिक्स मारले होते. त्या जोरावर तिने नाबाद 76 धावांची खेळी केली होती. या उत्कृष्ठ खेळीने तिने खळाच्या केंद्रस्थानी झेप घेतली. डब्ल्यूपीएलमधील हे तिचे दुसरे अर्धशतक आहे.
कोणते खेळाडू खेळले : दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मेग लॅनिंग (क), शफाली वर्मा, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, तानिया भाटिया (डब्ल्यू), मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस हे खेळाडू खेळले होते. तर गुजरात जायंट्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सब्भिनेनी मेघना, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, ऍशलेग गार्डनर, जॉर्जिया वेयरहम, सुषमा वर्मा(डब्ल्यू), दयालन हेमलता, स्नेह राणा (क), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर हे खेळाडू खेळले होते.
सामन्यावर प्रतिक्रीया : सामना संपल्यावर गुजरात जायंट्सची कॅप्टन स्नेह राणा हिने प्रतिक्रीया देताना म्हटले की, खेळाडू शक्य तितक्या चांगल्या खेळल्या. खेळपट्टी थोडीशी खराब होती. नाणेफेक जिंकल्यावर गोलांदाजी करणे हा निर्णय चूकीचा ठरला असे तिने म्हटले आहे. शेफाली आजच छान खेळली. ते खेळ अविश्वसनीय होता. शेफालीने पर्तिक्रीया देताना म्हटले की, सामन्यात मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होते. सामना जिंकल्यावर आराम करू शकतो आणि जिकन्याचा आनंद घेऊ शकतो. भविष्यात कठोर परिश्रम करायचे आहेत आम्ही सर्वांनी संघासाठी आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते करत राहू.