अहमदाबाद : राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (SGST) विभागातील 34 वर्षीय वरिष्ठ लिपिक वसंत राठोड यांचा शनिवारी क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राठोड अहमदाबादच्या भडज येथील डेंटल कॉलेजमध्ये क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ही तिसरी घटना आहे. एसजीएसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'सामनादरम्यान राठोडचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. गोलंदाजी करताना तो ठीक होता. राठोड यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या सहकारी खेळाडूंनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. ज्या डेंटल कॉलेजमध्ये मॅच होत होती त्याच डेंटल कॉलेजमध्ये राठोडला ॲडमिट करण्यात आले.
एसजीएसटी मुख्यालयात कार्यरत : हळूहळू त्याची ऑक्सिजन पातळी कमी होत गेली. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. राठोड हे वस्त्रापूरचे रहिवासी होते. ते अहमदाबाद येथील एसजीएसटी मुख्यालयात कार्यरत होते. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, राजकोटचा 27 वर्षीय प्रशांत भरोलिया आणि सुरतचा 31 वर्षीय जिग्नेश चौहान यांचाही आठवड्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. क्रिकेट खेळताना दोन्ही खेळाडूंच्या छातीत दुखू लागले. त्यांचा उपचार दरम्यानच मृत्यू झाला.
रुग्ण अनेकदा अनभिज्ञ : हृदयविकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झपाट्याने वाढ होत आहे. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण म्हणजे नियमित धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मधुमेह. अयोग्य जीवनशैलीमुळेही ही प्रकरणे वाढत आहेत. शरीरावर अचानक होणारे परिश्रम ते आधीच वाढलेले उच्चरक्तदाब अशी कारणे वेगवेगळी असतात. काही अलीकडील घटनांमध्ये मृत्यूचे कारण योग्य वैद्यकीय तपासणीनंतरच निश्चित केले जाऊ शकते. तरीही, जेव्हा त्या व्यक्तीस मधुमेह असेल, नियमितपणे धूम्रपान करते किंवा मद्यपान करते तेंव्हा मूळ कारणे शोधणे ही काळाची गरज आहे, असे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणाले.
पहिली महिला कोचचाही मृत्यू : झिम्बाब्वेची पहिली महिला खेळाडू असणारी मोफूचा देखिल मृत्यू झाला. वर्ष 2020-21 च्या सीजनमध्ये सिनीकिवे मोफूच्या कोचिंगमध्ये माउंटेनीयर्स टीमने वनडे चॅम्पियनशिप तिने जिंकली होती. मागच्यावर्षी तिच्या मार्गदर्शनाखाली टीम फायनलमध्ये पोहोचली. आपल्या माजी महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूवर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दु:ख व्यक्त केले. तुम्हाला किंवा तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास जाणवतोय असे लक्षात आल्यानंतर तात्काळ ॲस्पिरीन किंवा डेस्पिरीन टॅबलेट त्या व्यक्तीला द्या. या टॅबलेटस् कोणत्याही जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये सहजासहजी उपलब्ध असतात.