ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम बनण्यापूर्वी मोटेराची काय होती स्थिती? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी - Motera Stadium

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम पूर्वी मोटेरा म्हणून ओळखले जात होते. हे स्टेडियम पूर्वीप्रमाणेच आताही सुंदर, भव्य आहे. मोटेरा पूर्वी उष्णता आणि धुळीसाठी प्रसिद्ध होतं. या स्टेडियमशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचा अहवाल मीनाक्षी राव यांनी तयार केला आहे. पाहूयात काय आहे अहवाल.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:34 PM IST

अहमदाबाद (गुजरात) : गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम आगोदर मोटेरा स्टेडियम म्हणूनही ओळखलं जातं होतं. या स्टेडियमचे पहिले नाव मोटेरा होतं. हे आता जगातील सर्वात आकर्षक स्टेडियम आहे. येथे 1 लाख 32 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. याच मैदानावर 14 ऑक्टोबरला भारत, पाकिस्तान यांच्यात सामनाही होणार आहे. या दोन देशांच्या खेळाडूंमध्ये मैदानावर नेहमीच तणाव पाहायला मिळतो. यावेळी मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांचा उत्साह वाढणार आहे.

सामन्याची उत्कंठा : भारताला या मैदानावर हरण्याची भीती आहे, आणि पाकिस्तानला गुजरातमध्ये भारताशी खेळण्याची भीती आहे. पाकिस्तानला प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच 1 लाख 32 हजार प्रेक्षकांचा आवाज एकत्र ऐकायाल मिळणार आहे. या मैदानात प्रेक्षकांना सांभाळणं, पोलीस विभागासाठी अवघड बाब आहे. या मैदानावर भारताचा नाराही विश्वचषकाचा उत्साह वाढवणार आहे. या मैदानावरील सर्व सामने उत्कंठा, थ्रिलरनं भरलेले असतील. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या मैदानावर कोण, कोणत्या खेळाडूंनी येथे आपले नाव प्रसिद्ध केलंय. मोटेरा स्टेडियमशी संबंधित काही उत्कृष्ट रेकॉर्ड आणि महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात.

  • जेव्हा हे मैदान 'सरदार पटेल स्टेडियम' म्हणून ओळखलं जात होतं. इंथ 7 मार्च 1987 रोजी कडाक्याच्या उन्हात सुनील गावस्कर यांनी 10 हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. अशी कामगिरी करणारे गावस्कर हे पहिले फलंदाज ठरले. ही अशी उपलब्धी होती की आजपर्यंत कोणत्याही महान खेळाडूला ती मोडता आलेली नाही. सर डॉन ब्रॅडमनही या विक्रमाच्या जवळ जाऊ शकले नाहीत.
  • याच मैदानावर सुनील गावस्कर यांनी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्फोटक खेळी केली होती. त्यांनी 395 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
  • कपिल देव यांनी 1994 मध्ये मोटेराच्या या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा सर रिचर्ड हॅडली यांचा विक्रम मागे टाकला होता. त्यानं त्याची 432वी विकेट घेतली होती. यावेळी प्रेक्षकांनी 432 फुगे आकाशात सोडले होते. हा सामना श्रीलंकेविरुद्ध होता ज्यात श्रीलंकेच्या लोकांनीही जोरदार जल्लोष केला.
  • कपिल देव यांनी 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध स्टेडियमच्या उद्घाटनाच्या सामन्यात 83 धावांत केवळ 9 विकेट्स घेतल्या होत्या.
  • मोटेरा येथील उष्णता सतत वाढत होती. दाट धुळीसह सूर्य थेट डोक्यावर यायचा. वर्षाच्या कोणत्या वेळी इथले हवामान बदलेल हे सांगता येत नाही. येथे उष्माघाताचा धोकाही असतो, हे टाळण्यासाठी टोपी घालण्याचा सल्ला दिला जातो.
  • हे स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम होण्यासाठी 2015 ते 2020 पर्यंत 5 वर्षे लागली. या स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च आला आहे. आता या स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. यामध्ये क्लब परिसर, रेस्टॉरंट, स्टँडच्या विस्ताराचं काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. हे मोटेरा स्टेडियम आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं ओळखलं जातं.
  • पूर्वी हे स्टेडियम तीव्र उष्णता, धुळीनं भरलेले म्हणून ओळखलं जात होतं.
  • या मैदानावर गेल्या वर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना झाला होता. येथेच २०११ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरी गाठली होती.
  • यंदा या स्टेडियमनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरचं वर्ल्ड कप फायनलचं वैभव हिरावून घेतलं आहे. यासोबतच या स्टेडियमनं ईडन गार्डनपेक्षाही मोठा असा लौकिक मिळवला आहे. ज्याची क्वचितच कल्पना केली गेली असेल.

हेही वाचा -

  1. Sachin Tendulkar : शून्याची भीती प्रत्येक खेळाडूला वाटते; सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण...
  2. Asian Games २०२३ : तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून ओजसनं नागपूरकरांना दिली 'सुवर्णभेट'
  3. Cricket World Cup 2023 : 'ही' आहे पाकिस्तान संघाची कमजोरी, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.