ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : अश्विन-अक्षर चर्चेत संदीप पाटील यांची उडी, उपांत्य फेरीचंही केलं भाकित - क्रिकेट विश्वचषक 2023

Cricket World Cup 2023 : माजी निवडकर्ते आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य संदीप पाटील यांनी विश्वचषकात अक्षरच्या जागी अश्विनच्या निवडीवर आपलं मत मांडलं. यासह त्यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील चार संघांचंही भाकीत केलं.

sandeep patil
sandeep patil
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 8:21 AM IST

कोलकाता Cricket World Cup 2023 : आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे अक्षर पटेलची मायदेशात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी हुकली. त्याच्या जागी आता अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आलाय. अश्विननं नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याचं फळं त्याला मिळालं. मात्र अश्विनचा शेवटच्या क्षणी संघात समावेश झाल्यानं, यावर देशभरातील क्रिकेटप्रेमींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Sandeep Patil
Sandeep Patil

अश्विनची निवड आधीच व्हायला हवी होती : याबद्दल बोलताना १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य संदीप पाटील म्हणाले की, अक्षरचं अशाप्रकारे संघातून बाहेर जाणं दुर्दैवी आहे. यासह पाटील यांनी अश्विनची या आधीच संघात निवड का झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यांच्या मते, भारतीय संघाला नेहमीच अश्विनसारख्या फिरकी गोलंदाजाची गरज भासते. ते सोमवारी कोलकातामध्ये ईस्ट बंगाल क्लबच्या क्रिकेट संघासोबत श्राची गटाच्या टाय-अप सोहळ्यात सामील झाले होते.

Sandeep Patil
Sandeep Patil

कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहचतील : पुढं बोलताना संदीप पाटील यांनी उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचतील याबद्दल भाकीत केलं. पाटील यांच्या मते, भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. विशेष म्हणजे, भारतीय उपखंडात विश्वचषक खेळला जात असतानाही त्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं नाही. पाटील म्हणाले की, त्यांचं हे मत संघांच्या अलीकडच्या फॉर्मवर आधारित आहे. तसेच आगामी विश्वचषकासाठी भारतच हॉट फेव्हरिट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

कोणता खेळाडू गेम चेंजर असू शकतो : विश्वचषकात भारताचा कोणता खेळाडू गेम चेंजर असू शकतो असं विचारलं असता, संदीप पाटील यांनी हार्दिक पांड्या, विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचं नाव घेतलं. संदीप पाटील हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आहेत. या व्यतिरिक्त, त्यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक, निवडकर्ते आणि बेंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे संचालक म्हणूनही काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : 'हे' ५ सर्वात अनुभवी खेळाडू विश्वचषकात दाखवू शकतात दमदार कामगिरी
  2. Cricket World Cup 2023 : यावर्षी तरी न्यूझीलंड विश्वचषक जिंकणार का? 'या' पाच खेळाडूंवर असेल विजय मिळवून देण्याची जबाबदारी
  3. Cricket World Cup 2023 : एकेकाळी 'यांनी' केलं होतं जागतिक क्रिकेटवर राज्य, वाचा क्रिकेटच्या पडझडीची कॅरेबियन कथा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.