ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासातील अव्वल पाच क्षेत्ररक्षक कोण?

Cricket World Cup 2023 : विश्वचषक 2023 ला अवघे काही तास उरले आहेत. विश्वचषकासाठी फलंदाज, गोलंदाजांसह सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची चर्चा होत असते. आशाच इतिहासातील पाच अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूबद्दल आज आपण जाणून घेऊया.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:03 PM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्ल्क आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड, न्यूझीलंड यांच्यात उद्या पहिला सामना होणार आहे. भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सर्व संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. सामन्यादरम्यान फलंदाज, गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकही महत्त्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही तुम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासातील महत्वाच्या पहिल्या पाच क्षेत्ररक्षक खेळाडूबद्दल सांगणार आहोत.

रिकी पाँटिंग : क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप-फाइव्ह क्षेत्ररक्षकांबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचं नाव या यादीत पहिल्या नंबरवर येत. पॉन्टिंगनं 1996 ते 2011 या कालावधीत विश्वचषक स्पर्धेत 46 सामन्यांमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यानं 28 कॅच घेतल्या आहेत. रिकी पाँटिंगनं एका सामन्यात सर्वाधिक तीन झेल घेतले आहेत. विश्वचषकात पॉन्टिंगची प्रत्येक सामन्यात झेल घेण्याची सरासरी 0.608 आहे.

जो रूट : विश्वचषकातील पहिल्या पाच क्षेत्ररक्षकांच्या यादीत इंग्लंडचा खेळाडू जो रुटचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटनं 2015, 2019 मध्ये दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. ज्यामध्ये त्यानं 17 सामन्यांमध्ये 20 कॅच घेतल्या होत्या. रूटनं एका सामन्यात सर्वाधिक तीन कॅच घेतल्या आहेत. जो रूटची एका सामन्यात कॅच घेण्याची सरासरी 1.176 आहे.

सनथ जयसूर्या : विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1992 ते 2007 या कालावधीत त्यानं विश्वचषक सामन्यांमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यानं 38 सामन्यांमध्ये 18 कॅच घेतल्या आहेत. एका सामन्यात त्याची कॅच घेण्याची सरासरी ०.४७३ आहे.

ख्रिस गेल : वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलचं नाव विश्वचषकातील पहिल्या पाच क्षेत्ररक्षकांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. गेलनं 2003 ते 2019 या कालावधीत 35 सामन्यांमध्ये 17 कॅच घेतल्या आहेत. ख्रिस गेलची विश्वचषकात कॅचची सरासरी 0.485 आहे.

फाफ डु प्लेसिस : दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस विश्वचषकाच्या इतिहासातील पहिल्या पाच क्षेत्ररक्षकांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 2011 ते 2019 पर्यंत 23 सामन्यांमध्ये 16 कॅच घेतल्या आहेत. प्लेसिसनं एका सामन्यात जास्तीत जास्त दोन झेल घेतले आहेत. एका सामन्यात त्याची कॅच घेण्याची सरासरी 0.727 आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्माची धोनीशी तुलना होऊ शकत नाही; पाहा कोण म्हणाले...
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकसाठी काही नियमांमध्ये बदल, काय आहेत बदल जाणून घ्या
  3. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.