ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी - क्रिकेट विश्वचषक 2023

Cricket World Cup 2023 : भारताचे माजी यष्टिरक्षक आणि निवडसमितीचे माजी प्रमुख किरण मोरे यांनी विश्वचषकाच्या आधी 'ईटीव्ही भारत'च्या संजीब गुहा यांच्याशी खास बातचित केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 'मेन इन ब्लू' उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करेल, असं भाकीत त्यांनी केलं आहे.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 12:57 PM IST

कोलकाता (पश्चिम बंगाल) Cricket World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक सुरू होण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. गुरुवारी सलामीच्या सामन्यात गतविजेता इंग्लंड न्यूझीलंडशी भिडेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यानंतर येत्या रविवारी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात यजमान भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे.

अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश : बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाली आणि तो विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची संघात निवड करण्यात आली. त्याच्या समावेशामुळे भारतीय संघ अधिक संतुलित झाला आहे. किरण मोरे यांचंही हेच मत आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वात संतुलित टीम आहे, असं ते म्हणाले.

टीम इंडियाला फक्त लय सापडण्याची गरज : किरण मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी एका खास फोन संभाषणात सांगितलं की, 'आपल्याकडे सर्वोत्तम संघ आहे. आपल्या संघात खूप चांगलं संतुलन आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, आपल्याकडे विकेट्स घेऊ शकणारे गोलंदाज आहेत, जे त्यांच्या दुखापतींना मागे टाकून आपलं सर्वोत्तम देण्यास तयार आहेत. टीम इंडियाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे 'लय'. सर्व भारतीय खेळाडू विश्वचषक २०२३ साठी सज्ज आहेत', असं ते म्हणाले.

भारताकडे उत्तम गोलंदाजी युनिट : किरण मोरे म्हणाले की, 'मेन इन ब्लू'ची फलंदाजी नेहमीच मजबूत राहिली आहे. परंतु यावेळी भारताची गोलंदाजीही सुरुवातीपासूनच घातक दिसत आहे. भारताकडे उत्तम गोलंदाजी युनिट आहे. पहिल्या १० षटकांपासून ते नंतर डेथ ओव्हर्सपर्यंत, ते प्रत्येक फेजमध्ये विकेट्स घेण्यास सक्षम आहेत. हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू असूनही तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. याशिवाय रवींद्र जडेजाही संघात आहे. तसंच कुलदीप यादव गोलंदाजीत विविधता आणतो, असं ते म्हणाले.

भारतीय खेळाडूंकडे मोठा अनुभव : किरण मोरे पुढे बोलताना म्हणाले की, 'भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संघातील अनेक खेळाडूंना भरपूर एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय या सर्वांनी भरपूर कसोटी क्रिकेटही खेळलं आहे. हा एक उत्तम संतुलित संघ आहे. भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : अश्विन-अक्षर चर्चेत संदीप पाटील यांची उडी, उपांत्य फेरीचंही केलं भाकित
  2. Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज
  3. Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.